(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satyendra Jain Viral Video : आपचे नेते सत्येंद्र जैन यांना तुरुंगात मसाज सुविधा? जेलमधील CCTV फुटेज समोर, व्हिडीओ व्हायरल
Satyendra Jain Viral Video : जेलमध्ये सत्येंद्र जैन चक्क मसाज करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार येथील सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
Satyendra Jain Viral Video : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी तिहार तुरुंगात (Tihar Jail) असलेले दिल्लीचे केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा एक व्हिडीओ (Video Viral) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जेलमध्ये सत्येंद्र जैन चक्क मसाज करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार येथील सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. यामुळे तिहार तुरुंगात बंदिस्त असलेले सत्येंद्र जैन यांना या ठिकाणी व्हिआयपी उपचार मिळत असून, ते अगदी ऐषारामी जीवन जगत असल्याचा आरोप करण्यात येतोय. हे फुटेज समोर आल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
दिल्लीच्या राजकारणात भूकंप होणार?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन बेडवर पडून काहीतरी वाचताना दिसत आहेत तर एक माणूस त्याच्या पायाला मालिश करताना दिसत आहे. दरम्यान, तिहार तुरुंगातील व्हायरल फुटेजवर जेल प्रशासनाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर, अंमलबजावणी संचालनालय (ED) या व्हिडीओ संदर्भात न्यायालयात पोहोचली आहे. हे फुटेज समोर आल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. शनिवारी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन तुरुंगात मसाजचा आनंद घेताना दिसत आहेत.
कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द
तुरुंगामध्ये एक अज्ञात व्यक्ती सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, याबाबत ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कोर्टात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द केले आहेत. सत्येंद्र जैन तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत. सत्येंद्र जैन यांना सुविधा दिल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह चार तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हून अधिक तुरुंग अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
भाजपकडून 'आप'वर टीका
हे फुटेज समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. हे फुटेज समोर आल्यानंतर भाजपने सत्येंद्र जैन यांना तुरुंगात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. शनिवारी तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांच्या बॅरेकमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. व्हायरल फुटेजमध्ये सत्येंद्र जैन त्यांच्या सेलमध्ये मसाज करताना दिसत आहेत.
LOWEST-LEVEL OF POLITICS BY BJP!@SatyendarJain has an L5-S1 vertebrae disc injury
— AAP (@AamAadmiParty) November 19, 2022
Doctor recommended Regular Physiotherapy/Acupressure Treatment
BJP is losing MCD & Gujarat elections so they illegally released his video, calling it ‘VIP treatment’
Here's the medical report: pic.twitter.com/wWStaoG3A8
चेष्टा करायला लाज वाटत नाही - 'आप'ची प्रतिक्रिया समोर
या सर्व प्रकारावर आप पक्षाचे मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलंय, आज भाजपकडून एखाद्याच्या आजाराची चेष्टा करत आहे. कोणीही आजारी पडू शकतो. देशाचे पंतप्रधानही आजारी पडू शकतात. असे वाईट कृत्य करणे योग्य नाही. उपचाराचे व्हिडीओ जारी करण्याचे वाईट कृत्य फक्त भाजपच करू शकते. पंतप्रधानांपासून तुरुंगातील व्यक्तीपर्यंत कोणीही आजारी पडू शकतो. सत्येंद्र जैन हे सहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. जेलमध्ये असताना त्यांना दुखापत झाली. त्याच्या मणक्यामध्ये दुखापत झाली आहे. रुग्णालयात त्यांच्या दोन शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. तसेच डॉक्टरांनी फिजिओथेरपी करण्यास सांगितले आहे. नियमित फिजिओथेरपी आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली, डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. मग त्याची चेष्टा करायला लाज वाटत नाही.
क़ानून में जेल में बंद आदमी को अधिकार है,
— AAP (@AamAadmiParty) November 19, 2022
यदि उसे बीमारी होती है तो इलाज दिया जाएगा। दूसरी जेलों में ऐसे Video मिल जाएंगे।
Court ने ED को Video Leak ना करने का निर्देश दिया। इसके बावजूद BJP ने Video चलाया। यह कोर्ट के आदेश का उल्लंघन है। इस पर हम कार्रवाई करेंगे।
- @msisodia pic.twitter.com/Cl2pwtx1Ra
30 मे रोजी ईडीकडून अटक
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, एप्रिलमध्ये ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 अंतर्गत जैन यांच्या कुटुंबातील आणि कंपन्यांची मिळून 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश होता. रिपोर्ट्सनुसार, 2015 मध्ये केजरीवाल सरकारचे मंत्री झाल्यानंतर जैन यांचे सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीच्या नावे ट्रान्सफर करण्यात आले होते. अटकेनंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीने जैन यांची विचारपूस केली, त्यावेळी त्यांनी कोरोनामुळे स्मरणशक्ती गमावल्याचा दावा केला होता.