एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
श्रीनगर : सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी (21 ऑगस्ट) जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक यांच्या नावाची घोषणा केली. याआधी एन. एन. व्होरा हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. व्होरा यांनी पाच-पाच वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.
कोण आहेत सत्यपाल मलिक?
सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपतमधील गरीब कुटुंबात झाला. मेरठ कॉलेजमध्ये त्यांनी आपलं महाविद्यायीन शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला.
1974 ते 1977 या काळात सत्यपाल मलिक हे उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होते. त्यानंतर 1980-86 आणि 1986-1992 या काळात राज्यसभेवर गेले. 1989-1991 या काळात नवव्या लोकसभेत म्हणजे 1989 साली अलिगढ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. बिहार, ओदिशा या राज्यांचं राज्यपालपदही त्यांनी सांभाळलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये संवेदनशील स्थिती
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या स्थिती अत्यंत संवेदनशील आहे. बकरी ईदच्या दिवशीच दहशतवाद्यांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली. शिवाय भाजपच्या एका कार्यकर्त्याचीही हत्या करण्यात आली. तसेच जमावाने दगडफेकही केली. दुसरीकडे आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडेही फडवले गेले.
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement