एक्स्प्लोर
प्रचारादरम्यान हृदयविकाराचा झटका, यूपीत 'सपा' उमेदवाराचा मृत्यू
लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुखःद घटना समोर आली. समाजवादी पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कन्नोजिया यांचं प्रचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमधील अलापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार होते.
उत्तर प्रदेश विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. चंद्रशेखर कन्नोजिया हे देखील आपल्या मतदार संघात प्रचारासाठी बाहेर पडले होते. मात्र त्यांना प्रचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
अर्ज भरण्याची तारीख संपल्यामुळे अलापूर मतदार संघाची निवडणूक रद्द केली जाण्याची शक्यता आहे. आंबेडकरनगरसह 11 जिल्ह्यांमध्ये 52 जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र नामांकनाची तारीख 9 फेब्रुवारीलाच संपली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement