एक्स्प्लोर
आयसिसच्या संपर्कातील 'ती' तरुणी घातपातात सहभागी नाही, सुटकेची शक्यता
घातपाताच्या शक्यतेनं काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या सादिया शेखनं कुठल्याही थेट कारवाईत सहभाग घेतला नाही. अशी माहिती पोलीस चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे तिला पुन्हा कुटुंबियांच्या हवाली केलं जाण्याची शक्यता आहे.

पुणे : घातपाताच्या शक्यतेनं काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या सादिया शेखनं कुठल्याही थेट कारवाईत सहभाग घेतला नाही. अशी माहिती पोलीस चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे तिला पुन्हा कुटुंबियांच्या हवाली केलं जाण्याची शक्यता आहे.
ISIS च्या संपर्कात आलेल्या पुण्यातील तरुणीला काश्मीरमध्ये बेड्या
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ही तरुणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर गुरुवारी रात्री ही तरुणी सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडली. तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं होतं. मात्र आता चौकशीतून ही तरुणी कुठल्याही गुन्हेगारी कृत्यात थेट सहभागी नसल्याचं पुढे येत आहे. मात्र असं असलं तरीही तिच्या ISIS कनेक्शनबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर























