एक्स्प्लोर

Delhi S Jaishankar : एस जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा खडसावलं, दहशतवाद माजवणाऱ्या शेजाऱ्यांशी संबंध ठेवणं फार कठीण

S Jaishankar : पुढील आठवड्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो , सन 2011 नंतर पहिल्यांदाच भारतात येणार आहेत. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला टोला लगावलाय.

Delhi S Jaishankar : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी अनेकदा पाकिस्तानला खडसावलेलं आपण पाहिलंय. यावेळीदेखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला टोला लगावलाय. पुढच्या आठवड्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा आहे त्याच अनुशंगाने जयशंकर यांनी टिप्पणी केली आहे.  सीमावर्ती भागात दहशतवाद माजवणाऱ्या शेजाऱ्यांशी संबंध ठेवणं फार कठीण आहे, असं मंत्री एस जयशंकर म्हणालेत. पुढील आठवड्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी, सन 2011 नंतर पहिल्यांदाच भारतात येणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या काही दिवसांनंतरच या घटनेचा निषेध परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यात आपले पाच भारतीय जवानही शहीद झालेत. सीमापार दहशतवादाचा पाकिस्तानकडून वारंवार वापर होत असल्याने एस जयशंकर यांनी कठोर शब्दात निषेध केलाय. त्यानंतर बिलावल यांच्यासोबत होणारी भेट ही औपचारिक द्विपक्षीय बैठक म्हणून पाहिली जातेय.

भारतात दौऱ्यासाठी येणाऱ्या बिलावल भुट्टो आणि त्यांचे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (Shanghai Cooperation Organisation) यजमानपद परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भूषवणार आहेत. 5 मे रोजी गोव्यात होणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी रशियाचे सर्गेई लावरोव्ह आणि चीनचे किन गँग यांचापण समावेश असणार आहे. इतरांसोबतच्या द्विपक्षीय बैठका निश्चित वाटत असल्या तरी जयशंकर आणि बिलावल नेमकी बैठक होणार आहे किंवा नाही याबद्दलचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. या होणाऱ्या सगळ्या बैठकांचं भारताकडून होस्टींग होणारेय, त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो या दोघांमध्ये सौजन्यपूर्ण बैठकीची शक्यता पूर्णपणे नाकारता येऊ शकत नाही, पण सरकारी सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे 'संरचित' बैठक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या दोघांच्या होणाऱ्या बैठकीवर अजूनही प्रश्नचिन्हच आहे. 

आपल्या विरोधात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या शेजाऱ्यांशी संबंध ठेवणे आपल्यासाठी खूप कठीण

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले, "या बैठकीच्या संबंधात, आम्ही दोघेही SCO चे सदस्य आहोत आणि आम्ही सहसा त्याच्या बैठकांना उपस्थित राहतो. यावर्षी आम्ही अध्यक्ष आहोत आणि म्हणूनच ही बैठक भारतात होतेय. परंतु यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या विरोधात सीमापार दहशतवाद करणाऱ्या शेजाऱ्याशी संबंध ठेवणे आपल्यासाठी खूप कठीण आहे. सीमेपलीकडील आणि सीमावर्ती भागात दहशतवादाला प्रोत्साहन न देणं, आणि पाकिस्तानने दहशतवादासंबंधी किंवा तत्सम कोणतीही हालचाल नं करणं शिवाय या सगळ्या गोष्टींची वचनबद्धता त्यांनी पाळायलाच हवी असं मी नेहमीच सांगत आलोय. आम्ही आशा करतो की एक दिवस आम्ही त्या टप्प्यावर पोहोचू,” असं एस जयशंकर म्हणालेत. पनामा सिटीमध्ये पनामा परराष्ट्र मंत्री जनैना टेवाने मेन्को यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना एस जयशंकर यांनी हे मत मांडलंय. बुइलावाल यांच्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर यांची टिप्पणी आली.  SCO चार्टर बिलावल भुट्टो यांना परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यापासून अडवतील, पण भारत सरकार परराष्ट्र मंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीपूर्वी किंवा नंतर कोणत्याही माध्यम संवादात बिलावल भुट्टो काय बोलतात यावर बारकाईने लक्ष देईल.

महत्वाच्या बातम्या :

BBC IT Survey: ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बीबीसी कार्यालयांवर आयटी सर्वेक्षणाचा मुद्दा केला उपस्थित, एस जयशंकर म्हणाले..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget