(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Edible Oil Prices : रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या झळा भारतात, खाद्य तेलांच्या किंमती गगनाला
युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर त्याचे विविध परिणाम होत असल्याचे दिसत आहे. भारतात देखील या युद्धाचा परिणाम होत आहे.
Edible Oil Prices : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर त्याचे विविध परिणाम होत असल्याचे दिसत आहे. भारतात देखील या युद्धाचा परिणाम होत आहे. देशात एकाच दिवसात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकारला 1 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतवरही परिणाम होत आहे. मागील चार महिन्यांपासून स्थिर असलेल्या खाद्यतेलाच्या भावात अचानक दोनच दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. भारतात जवळपास 70 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून आयात केले जाते. पण युद्धामुळे या आवकेवर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर काही भागात तेलाची साठेबाजी झाल्यामुळेही खाद्यतेलाचे भाव अचानक वाढले असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.
तेलाचे आजचे भाव
सोयाबीन तेल - बुधवारचा भाव - 150 रु प्रती किलो ( आजचा - 163 रु)
पामतेल - बुधवारचा भाव - 145 रु प्रति किलो (आजचा 155 रु)
सूर्यफूल तेल - बुधवारचा भाव - 160 रु प्रती किलो ( 170 रु)
शेंगदाणा तेल - बुधवारचा भाव - 170 रु प्रती किलो ( 177रु)
दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकारला 1 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कच्च्या तेलाचे भाव 90 डॉलर्सपार गेल्याने पुढच्या वर्षभरात सरकारचा महसूल 95 हजार कोटी ते 1 लाख कोटींनी कमी होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर्सपार गेल्या आहेत. 2014 नंतर ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढून महागाईचा भडकाही होणार आहे.
कच्च्या तेलाचे भाव 90 डॉलर्सपार गेल्याने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 95,000 कोटी रुपयांपासून ते 1 लाख कोटी रुपयांचा महसूली तोटा होऊ शकतो, असे देशातील सर्वात मोठ्या कर्जदार SBI च्या आर्थिक संशोधन शाखेच्या अहवालात म्हटले आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने एका अहवालात म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने 2023 च्या आर्थिक वर्षात केंद्राला एकूण 92,000 कोटी रुपयांचा महसूली तोटा सहन करावा लागेल. उच्च जागतिक तेलाच्या किरकोळ महागाईवर परिणाम होईल.
दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीयांना देखील भोगवा लागत आहे. त्याचा झळा भारतीयंना लागणार आहेत. खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाल्याने युद्धाची झळ तेट स्वयंपाक घराला बसणार आहे. काही ठिकाणी तेलांची साठेबाजी देखील सुरू असल्याची माहिती आहे. सुर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.
महत्त्वाच्या बातम्या: