एक्स्प्लोर

'भविष्य का भारत' चर्चासत्रात सरसंघचालकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. संघ आणि जातीव्यवस्था प्रश्न : हिंदू समाज जातीव्यवस्थेकडे कसं पाहतो? हिंदू समाजात एससी/एसटी समाजाचं महत्त्व काय? सरसंघचालक : जातीव्यवस्था म्हणतात हे चुकीचं आहे. ही व्यवस्था कुठे आहे. ही तर अव्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपणार हे ठरलेलं आहे. आमचा जातीय विषमतेवर विश्वास नाही. हा एक मोठा प्रवास आहे आणि आम्हाला तो करावाच लागेल. आम्ही संघात कुणाची जात विचारत नाही. जेव्हा मला सरसंघचालक म्हणून निवडण्यात आलं तेव्हाही माध्यमांनी चालवलं की भागवतांना संघाने निवडलं मात्र ओबीसी समाजाला संघाचं प्रतिनिधीत्व द्यायचंय त्यामुळे सोनीजींना बनवलं गेलं. जेव्हा सोनीजींनी मी विचारलं तुम्ही ओबीसीमध्ये येता का? ते हसले आणि आजपर्यंत मला समजलेलं नाही  सोनीजी जातीने कोण आहेत. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्यकारिणी लवकरच दिसेल. म्हणूनच म्हटलं प्रवास खूप मोठा आहे. प्रश्न : आरक्षणाबाबत संघाची भूमिका काय? जातीव्यवस्था कधीपर्यंत राहील? संघर्षावर उपाय काय? सरसंघचालक : सामाजिक विषमतेला हटवून सर्वांना समान संधी देण्यासाठी संविधान सक्षम आहे. संविधानात आरक्षणासाठी जी तरतूद आहे, त्याला संघाचं पूर्ण समर्थन आहे. ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालाय त्यांनाच तो कधीपर्यंत घ्यायचा हे ठरवावं लागेल. जेव्हा त्यांना वाटेल, ते ठरवतील. क्रीमी लेयरचं काय करायचं हेही समाजच ठरवेल. आरक्षण ही समस्या नाही, मात्र आरक्षणावर होणारं राजकारण ही समस्या आहे. हातात हात घेऊन जो खड्ड्यात पडलाय त्याला वर आणलं पाहिजे. 1000 वर्षांचा अपमान दूर करण्यासाठी 100-150 वर्षं झुकणं काही महागडा सौदा नाही. सर्वजण तयार आहेत. समलैंगिकता आणि कलम 377 चर्चेचा विषय आहे, तृतीयपंथीयांबाबत संघाचं मत काय? सरसंघचालक : हे सर्वचजण समाजाचा एक भाग आहेत. त्यांची व्यवस्था समाजालाच करावी लागेल. आता वेळ बदलला आहे. त्यामुळे समाजाने ती करणं गरजेचं आहे. जर कुणामध्ये वेगळेपण आहे तर त्यामुळे समाजात आपण कुणीतरी वेगळे आहोत ही भावना तयार होता कामा नये. तसंच सर्वजण सारखेच आहेत, समाज स्वस्थ राहील याचीही व्यवस्था करावी लागेल. राम मंदि प्रकरणावर शाह बानोसारखाच कायदा बनवणं शक्य आहे? सरसंघचालक : अध्यादेश काढणं सरकारच्या हातात आहे, संवादाचा भाग रामजन्मभूमीकडे आहे. मी दोन्हीमध्ये नाही. मात्र चर्चा व्हावी असं संघाला वाटतं. संघाचा प्रमुख या नात्याने असं वाटतं की भव्य राम मंदिर लवकरच बांधलं जावं. पण ते फक्त भगवान राम नाहीत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना इमामे हिंदही मानतात. जर राम मंदिर बांधलं जाईल, तर हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणावाचं कारणच संपून जाईल. राम मंदिर जसं बांधलं जाईल तसं लवकरात लवकर बांधलं जावं. प्रश्न : पर्यावरणाच्या नावाखाली हिंदू सणांना विरोध केला जातो सरसंघचालक : पर्यावरणाच्या नावाखाली विरोध होतोय तर काही सण पर्यावरणपुरक नाहीत. आणि फक्त  हिंदूंच्याच सणांना विरोध का? मात्र समाजाचं मन बदलेल तेव्हा बदलेल. लोक मानतील पण ज्याप्रकारे सण साजरे केले जातात त्यामुळे संशय उत्पन्न होतो. हिंदी कधी राष्ट्रभाषा बनेल? अनेक संस्थांमध्ये इंग्रजीचं प्रभुत्व आहे. जे हिंदी किंवा संस्कृत असावं सरसंघचालक : इंग्रजीशी कोणतंही शत्रुत्व नाही, मात्र चांगलं हिंदी बोलणारे असतील, एक भाषा आपण शिकू. एका भाषेमुळे जर देशात कटुता निर्माण होत असेल तर आपलं मन कसं बनावं हा विचार करावा लागेल. हिंदीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषांपैकी कोणतीही एक भाषा हिंदीभाषिक शिकेल तर हिंदीतर भाषा शिकण्यात पुढे येईल. संस्कृतला आपण प्राधान्य देत नसल्यामुळे संस्कृत शाळा कमी होत चालल्या आहेत. आपण आपल्या मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget