एक्स्प्लोर
200 रुपयांच्या नोटेचा आज श्रीगणेशा, पण ATM मध्ये मिळणार नाहीत!
200 रुपयांच्या नव्या नोट आरबीआयच्या निवडक कार्यालयांमध्ये आणि काही बँकांमध्येच उपलब्ध असतील. सध्या या नोटा एटीएममध्ये मिळणार नाही, कारण नव्या नोटांसाठी एटीएम रिकॅलिबरेशन करण्याची आवश्यकता आहे.
नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशात आजपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना नुकतीच जारी केली होती. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार आहेत.
दरम्यान दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.
100 आणि 500 रुपयांमधील एखादी नोट चलनात आणण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. 100 रुपयानंतर थेट 500 आणि त्यानंतर थेट दोन हजाराची नोट, यामुळे या चलनात मोठी तफावत जाणवत असे. त्यामुळे दोनशे रुपयांची नोट आणली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
200 रुपयांच्या नव्या नोट आरबीआयच्या निवडक कार्यालयांमध्ये आणि काही बँकांमध्येच उपलब्ध असतील. सध्या या नोटा एटीएममध्ये मिळणार नाही, कारण नव्या नोटांसाठी एटीएम रिकॅलिबरेशन करण्याची आवश्यकता आहे.
नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट असेल. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आज दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
200 च्या नोटेची वैशिष्ट्ये
- नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो
- नोटेवर स्वच्छ भारतचा लोगो
- नोटेचा आकार 66 mm × 146 mm
- अंधाना नोट ओळखता येणार
- नोटेवर हिरव्या रंगात ‘RBI’, ‘भारत’,‘India’ and ‘200’
दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement