एक्स्प्लोर

Sarathi Portal : ड्रायव्हिंग, लर्निंग आणि कंडक्टर लायसन्सची वैधता 29 फेब्रुवारीपर्यंत वाढवली, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा दिलासा 

Sarathi Portal Update: अर्जदारांना 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान सारथी पोर्टलवर आलेल्या समस्यांमुळे परवाना संबंधित सेवा मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागला होता. 

Driving Licence : ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्सची वैधता संपत आहे अशा लोकांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) मोठा दिलासा दिला आहे. आता परवान्याची वैधता कालावधी 29 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने परिपत्रकात म्हटले आहे की, सारथी पोर्टल (https://sarathi.pariva han.gov. in) मध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित कारणांमुळे, अर्जदारांना 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करण्याची परवानगी दिली होती. पण या दरम्यान परवाना संबंधित सेवा मिळविण्यात अडचणींना सामोरे जावे लागेल.

सर्व्हर डाऊनचा फटका नागरिकांना

आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी, पोर्टलवरील ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी अंशतः डिसेबल करण्यात आल्या होत्या. जेणेकरून आरटीओ खाते सुरळीत काम करू शकेल. अशा परिस्थितीत ऑनलाइन सेवा अंशतः बंद झाल्यामुळे अनेक अर्जदार शुल्क भरू शकत नाहीत, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, शिकाऊ परवान्यासाठी बुक स्लॉट आणि ड्रायव्हिंग कौशल्य चाचणीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

वाहतूक पोर्टलवर नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की शिकाऊ परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्स ज्यांची वैधता 31 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपली आहे,  त्यांच्यावर कोणताही दंड न आकारता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत वैध मानले जाईल. अशी कागदपत्रे 29 फेब्रुवारीपर्यंत वैध मानावीत अशा सूचना अंमलबजावणी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ज्यात परिवहन पोर्टलवर बरेच लोक अर्ज करू शकत नसल्याचे सांगण्यात आले होते.त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

लायसन्स कसे काढाल?

तुम्हाला शिकाऊ परवान्यासाठी (Lerning Licence) अर्ज करायचा असेल किंवा कायमस्वरूपी परवाना मिळवायचा असेल तर तुम्ही अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकता. तर आता शिकाऊ परवाना मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. तसेच, शिकाऊ परवाना डिजिटल पद्धतीनं मिळू शकतो. तर कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी आरटीओला जावं लागतं.

कायमस्वरूपी परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जावं लागतं. शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत साइटला भेट द्या. 
(https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do). येथे तुम्हाला एक संपूर्ण यादी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला Learner License चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला आधारचा पर्यायही दिसेल. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचे तपशील टाकावे लागतील. यासोबतच मोबाईल नंबरवर एक ओटीपीही येईल. सर्व तपशील टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 50 रुपयांची फी भरावी लागेल. तुम्ही या प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यास लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 7 दिवसांत थेट तुमच्या घरी पोहोचेल.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
×
Embed widget