एक्स्प्लोर

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा मेंदू, पाठीचा कण्याचा एमआरआय नॉर्मल, जखमांवर प्लास्टिक सर्जरीही झाली, रिपोर्टमधून माहिती 

आज सकाळी रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात रिषभ गंभीर जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

Rishabh Pant Accident:  आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती तीन दुखद बातम्यांनी झाली. पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन झालं. दुसरी बातमी फुटबॉलचे देव पेले यांचं निधन आणि तिसरी बातमी होती भारतीय संघाचा क्रिकेटपटू रिषभ पंतच्या अपघाताची. आज सकाळी रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात रिषभ गंभीर जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या ट्विटनुसार, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे.  चेहऱ्यावरील जखमांसह इतर जखमा आणि ओरखड्यांवर डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी  देखील केली असल्याची माहिती आहे. उद्या शनिवारी ऋषभ पंतचा घोटा आणि गुडघ्याचा एमआरआय होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. पंतच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत आणि उजव्या गुडघ्यात एक लिगामेंट फाटले आहे परंतु सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे बीसीसीआयनं म्हटलं आहे. 

बीसीसीआयनं म्हटलं आहे की, भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे उत्तराखंडच्या रुरकीजवळ कार अपघात झाला. त्याला सक्षम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर झालेल्या दुखापतींवर उपचार करण्यात आले. ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी दुखापत झाली आहे तर गुडघ्याचे एक लिगामेंट फाटले आहे. त्याच्या उजव्या गुडघ्यात आणि त्याच्या उजव्या मनगटात, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीलाही दुखापत झाली आहे.

ऋषभची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. याच ठिकाणी त्याचे एमआरआय काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी  त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता.  यावेळी त्याला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला.  गाडीला आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची विंडोस्क्रीन तोडली. हरियाणा रोडवेजच्या बसचा चालक आणि इतरांनी त्याला तिथून बाहेर पडण्यास मदत केली, असे हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमध्ये एकटाच असलेल्या पंतला डुलकी लागल्यानं आग लागण्यापूर्वी कार डिव्हायडरला धडकली, असंही सिंह यांनी सांगितलं.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale & Suresh Dhas : सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'
रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप
रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप
Satish Bhosale : आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचारUddhav Thackeray | संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचारAnil Parab On Bhaiyyaji Joshi | मुंबईची माफी मागा.., भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन परबांचा संतापABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 06 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale & Suresh Dhas : सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'
रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप
रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप
Satish Bhosale : आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अनाजीपंत म्हणत उद्धव ठाकरे कडाडले
एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अनाजीपंत म्हणत उद्धव ठाकरे कडाडले
Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
Fact Check : काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणी सोशल मीडियावर चुकीचे दावे, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Fact Check : काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणी सोशल मीडियावर चुकीचे दावे, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Jaykumar Gore Photos: जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
Embed widget