Weather Update : उष्णतेचा प्रकोप, येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट
एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.
![Weather Update : उष्णतेचा प्रकोप, येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट Rise in temperature in the country, heat wave will hit some states in the next 24 hours Weather Update : उष्णतेचा प्रकोप, येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/262a06156460e6d954e436f26224f6f7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weather Update : सध्या देशात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दिल्लीपासून ते उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, केरळ आणि काही राज्यांत उष्णतेने थैमान घातले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये येत्या 24 तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, एप्रिल महिन्यात कडक उन्हाचा अंदाज वर्तवला जात आहे. IMD ने तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 39 आणि किमान तापमान 19 अंशांवर नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे राजधानीत सुद्दा उन्हाच्या चांगल्याच झळा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे.
बिहारमध्ये पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये, पूर्व आणि आग्नेय हवेचा प्रवाह पृष्ठभागापासून 0.9 किमी पर्यंत जात आहे. केवळ राज्याच्या नैऋत्य भागात, पश्चिमेकडील आणि उत्तर-पश्चिम हवेचा प्रवाह पृष्ठभागापासून 1.5 किमी पर्यंत राहतो. हवामानातील बदलांमुळे बिहारच्या उत्तर-पूर्व भागात काही ठिकाणी पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ आकाशासह हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रातही उष्णतेची लाट
राज्यात उष्णतेची लाट कायम असून अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आलं. तर काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर होतं. सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला (44 अंश सेल्सिअस) आणि त्यानंतर मालेगाव, चंद्रपूर (43 अंश सेल्सिअस) इथे झाली. हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. विदर्भातील गडचिरोली वगळता अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Heatwave : महाराष्ट्र तापला, 3 एप्रिलला अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान
- Maharashtra Weather : महाराष्ट्र तापतोय, काळजी घ्या...! 'या' जिल्ह्यांत सर्वाधिक तापमान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)