एक्स्प्लोर

Maharashtra Weather : महाराष्ट्र तापतोय, काळजी घ्या...! 'या' जिल्ह्यांत सर्वाधिक तापमान 

विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्याचा पहिला नंबर आहे.

Maharashtra Weather Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान कमालीचं वाढताना दिसत आहे. हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्याचा पहिला नंबर आहे. तापमान वाढीत मागील 5 दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. 

23 मार्च ते 27 मार्च अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद आहे.  वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत.  राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे. 

14 मार्च रोजी रत्नागिरीत 40.2 अंश सेल्सिअस तापमान, त्यानंतर 17 आणि 22 मार्च तारखा वगळता अकोलाच तापमानाच्या बाबतीत पहिल्या स्थानी असल्याचं दिसून येतंय. 17  मार्च रोजी विदर्भात चंद्रपूरमध्ये 43 अंश सेल्सिअस इतकी नोंद तर 22 मार्च रोजी 42 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली होती.  स्थानिक स्टेशनची जागा, वाऱ्यांचा वाहणारा वेग, बाष्प पॅटर्न आणि उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात बदल होऊ शकतात, असं तज्ञांचं म्हणणं आहे. 

15 पासून कालपर्यंत अकोल्यातील तापमान कसं होतं?
 
15 मार्च - 41.1

16 मार्च - 42.9

17 मार्च - 42.8 — चंद्रपूर - 43

18 मार्च - 42.7

19 मार्च - 42.1

20मार्च - 41.9

21 मार्च - 41.7

22 मार्च - 41.4 — चंद्रपूर - 42 

23 मार्च - 41.6

24 मार्च - 42

25 मार्च - 42.3

26 मार्च - 42.8

27 मार्च - 42.3

हळूहळू तापमानात वाढ होणार असून  नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दिवसा वाढलेल्या तापमानाचा परिणाम रात्रीच्या तापमानावर देखील होणार आहे. वाढत्या झळांमुळे आता रसवंती गृह आणि लिंबू सरबताच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
Eknath Shinde: 'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती
सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज
सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातयं? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातयं? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Embed widget