(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day : प्रजासत्ताकदिनी दिसणार आतापर्यंतचे सर्वात मोठे फ्लायपास्ट, 5 राफेलसह 75 विमानं घेतील सहभाग
Republic Day Parade 2022: दिल्लीत यंदाच्या वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशीच्या परेडदरम्यान जवळपास 24 हजार लोकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे.
Republic Day Parade 2022 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून (Azadi Ka Amrit Mahotsav) यंदा प्रजासत्ताक दिनाची परेडसुद्धा खास असणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या उत्सवानिमित्त दिल्लीच्या राजपथावर पहिल्यांदाच 75 एअरक्राफ्ट उड्डाण करताना दिसणार आहेत. यामध्ये 5 राफेल विमानांचासुद्धा समावेश असणार आहे.
एअरफोर्सची पीआरवो विंग कमांडर इंद्रानी नंदी यांनी सांगितले की, यावेळी सगळ्यात भव्य फ्लायपास्ट होणार आहेत. यामध्ये हवाई दलासह नौदलाची जहाजेसुद्धा सहभाग घेणार आहेत. तसेच, राजपथावर 5 राफेलसुद्धा उड्डाण करणार आहेत. पुढे त्या असंही म्हणाल्या की, यावेळी 17 जेगुआर फायटर एअरक्राफ्ट '75' च्या शेपमध्ये आकाशात भरारी घेणार आहेत. त्याचबरोबर, MiG29Kआणि P-81 सर्विलान्स ही लढाऊ विमानेसुद्धा आकाशात उड्डाणासाठी तयार आहेत.
उपस्थितीवर निर्बंध :
दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतोय. वाढत्या रूग्णांची संख्या पाहता या वर्षी दिल्लीत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान केवळ 24 हजार लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या महामारी पूर्वी 2020 रोजी जवळपास 1.25 लाख लोकांची उपस्थिती होती.
रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी कोविड-19 च्या उद्रेकादरम्यान प्रजासत्ताक दिन परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी 25 हजार लोकांची उपस्थिती होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वेळेसप्रमाणे यावेळीही जागतिक महामारीमुळे परदेशातील कोणत्याही मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार नाही. तसेच, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक आणि ताजिकिस्तानच्या नेत्यांना आमंत्रित करण्याची भारताची योजना आहे.
यावर्षी परेड दरम्यान उपस्थित असलेल्या सुमारे 24,000 लोकांपैकी 19,000 लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. तसेच, जे तिकीट विकत घेऊ शकतील असे सामान्य नागरिक उपस्थित असतील. परेड दरम्यान कोविड-19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाईल. लोकांच्या बसण्याची व्यवस्था करताना सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील, असे सूत्रांनी सांगितले. तसेच, सर्व ठिकाणी सॅनिटायझर फवारणी उपकरणे बसवली जातील आणि मास्क घालणे बंधनकारक असेल असे सांगण्यात आले.
हे ही वाचा :
- Punjab Election 2022: पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी लांबणीवर
- राष्ट्रवादी-शिवसेनेची गोवा विधानसभेसाठी आघाडी होणार का? दोन्ही पक्षांची उद्या गोव्यात बैठक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha