एक्स्प्लोर

राष्ट्रवादी-शिवसेनेची गोवा विधानसभेसाठी आघाडी होणार का? दोन्ही पक्षांची उद्या गोव्यात बैठक   

उद्या गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Goa Assembly Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येतील तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांसह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठीच्या बैठकीला उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार आहेत. उद्या शिवसेनेसोबत अंतिम चर्चा होईल त्यावर प्रफुल पटेल निर्णय जाहीर करतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

"उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

दरम्यान, गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि  ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही यावेळी आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे गोव्यात कोणाचं  सरकार येणार? हे 10 मार्च रोजी समजणार आहे. 

गोव्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. गोवा विधानसभेत भाजपचे 25 आमदार असून नुकतेच आमदार कार्लोस अल्मेडिया आणि एलिना सलडाना यांनी राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CET : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 मध्ये होणार तब्बल 21 सीईटी परीक्षा; 'या' 11 अभ्यासक्रमांसाठी मिळणार दोन संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 मध्ये होणार तब्बल 21 सीईटी परीक्षा; 'या' 11 अभ्यासक्रमांसाठी मिळणार दोन संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
FDA Action In Akkalkot Swami Samarth Temple: अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Embed widget