Punjab Election 2022: पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान
पंजाबमध्ये 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने 14 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार आहे. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे.
Punjab Election 2022 : पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने 14 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार आहे. संत रविदास यांची जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आज निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक 14 ऐवजी 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंजाब विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेततला होता. परंतु, रविदास यांची जयंती असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी केली होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत विचार करण्यासाठी आज बैठक बोलवली होती. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांची बाजू विचारात घेत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, आम आदमी पक्ष, भाजप, अकाली दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्यामुळे पंजाबमधील लाखो लोक वाराणसीला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार. अनेक मतदारांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी या पक्षांनी केली होती. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Election 2022 : तुमच्या मनातून जात कधी जाणार?, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- UP Election: नरेश टिकैत यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही; राकेश टिकैत यांचे स्पष्टीकरण
- 'बापाची चप्पल आली, म्हणजे बापाची अक्कल येत नाही', आनंद परांजपेकडून श्रीकांत शिंदे यांना टोला, महापौर नरेश मस्केंकडूनही प्रत्युत्तर