(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day 2022 : देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Republic Day 2022 : भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Republic Day 2022 : भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
भारताला ब्रिटिश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली गेली. बरेचसे विचार-विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसांनंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने 26 जानेवारीला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' हा साजरा करण्यात येऊ लागला.
का साजरा केला जातो 'प्रजासत्ताक दिन'?
देशभरात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो.
संबंधित बातम्या
Republic Day 2022 Song : बॉलिवूडमधील ‘ही’ देशभक्तीपर गाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील
Republic Day 2022: यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्याविना, कोरोनामुळे केंद्राचा निर्णय
Republic Day 2022 Stickers : प्रजासत्ताक दिनादिवशी शुभेच्छा देण्यासाठी असे डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टीकर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha