Independence Day 2021 : स्वातंत्र्य दिनी दिल्लीत घातपाताची शक्यता, दिल्लीत कडक सुरक्षा तैनात
स्वातंत्र्य दिनी कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
![Independence Day 2021 : स्वातंत्र्य दिनी दिल्लीत घातपाताची शक्यता, दिल्लीत कडक सुरक्षा तैनात Red Fort on Independence Day police and paramilitary forces and army personnel deployed in security of Red Fort Independence Day 2021 : स्वातंत्र्य दिनी दिल्लीत घातपाताची शक्यता, दिल्लीत कडक सुरक्षा तैनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/21/987489d5ba97fd0519a81210b618318d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादी संघटनांकडून घातपात केला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी दिल्ली पोलिस, आर्मीच्या जवानांबरोबर कंटेनरची एक उच्च भिंत तयार करण्यात आली आहे. एवढच नाही तर नागरिकांना सजग करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याच्या परिसरात मोस्ट वॉंटेड आतंकवाद्यांचे पोस्टर देखील चिकटवले आहे. ज्यामध्ये सहा आतंकवाद्यांचे फोटो आहे, तसेच याची माहिती मिळाल्यास दिल्ली पोलिसांना सांगण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादी संघटना भारतात स्वातंत्र्य दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली होती. त्यामुळे देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाला पुढे करून स्वातंत्र्यदिनी देशाची शांतता बाधित करण्याचा कट रचला जाण्याची शक्यता असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराच्या घटनेची पुनावृत्ती होण्याची शक्यता आहे. तसेच प्रधानमंत्री दरवर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. परंतु या वर्षी कंटेनरमुळे लाल किल्ल्यासमोरील चांदणी चौकातून पंतप्रधानांना पाहता येणार नाही.
सुरक्षेच्या कारणांमुशे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ला आणि आसपासचा परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषीत करण्यात येतो. सुरक्षेसाठी दरवर्षी अँटी एअरक्राफ्ट सिस्टम लाल किल्ला परिसरात तैनात करण्यात येते. गुप्तचर यंत्रणानी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी लाल किल्ला आणि राजधानी दिल्लीतील काही विविआयपी भागात ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यानंतर लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात ड्रोन रडार सिस्टम बसविण्यात आली आहे. जी 10 ऑगस्टपासून कार्यरत होणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही रडार सिस्टीम परिसरात उडणाऱ्या ड्रोनची फ्रिक्वेनसी कॅच करत आणि त्यानंतर ते रडार फ्रीज करते. ज्यामुळे ते ड्रोन खाली पडते. या रडारची रेंज 5 किमी आहे. स्वातंत्र्य दिनी घातपात घडवण्यात येण्याची शक्यता असल्याने सर्व तपास यंत्रणांनी सतर्क राहावे असे देखील गुप्तरच यंत्रणानी म्हटले आहे.
Independence Day 2021 High Alert: ड्रोनच्या माध्यमातून राजधानी दिल्लीत हल्ला होण्याची शक्यता; आयबीचा दिल्ली पोलिसांना अलर्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)