एक्स्प्लोर
RBIचा 5 परदेशी बँकांना दणका, फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
नवी दिल्ली: सध्या देशात नोटाबंदी आणि रिझर्व बँकेकडून काढण्यात येणाऱ्या रोज नवनव्या फतव्यामुळे बँकेचे सर्वत्र चर्चिली जात आहे. त्यातच रिझर्व बँकेने पाच परदेशी बँकांना दंड ठोठावल्याने जगाचेही लक्ष आरबीआयकडे वळले आहे.
आरबीआयने बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ टोकियो, मित्सुबुशी, डॉएश बँक, बँक ऑफ स्कॉटलंड, स्टॅडर्ड चार्टेड बँकांवर भारतातील आर्थिक देवाणघेवाणी संदर्भातील फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत दंड ठोठावला आहे.
Foreign Exchange Management Act (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने बँक ऑफ अमेरिका, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, आरबीएस अॅन्ड बँक ऑफ टोकियो मित्सुबिशी यांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तर जर्मनीची डॉएश बँकेला 20 हजाराचा दंड ठोठावला आहे.
रिझर्व बँकेने या बँकांना नोटीसा पाठवून स्पष्टीकरण मागितले होते. यावर पाचही परदेशी बँकांनी आपले लिखित उत्तर आरबीआयकडे पाठवले. मात्र, बँकांनी समाधानकारक उत्तरे दिले नसल्याने फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement