![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rath Yatra | जगन्नाथ रथयात्रेला अटी-शर्थीसह परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
राज्य सरकार आणि मंदिर न्यायाच्या सहकार्याने आरोग्यसंबंधीचा कोणत्याही नियामांचं उल्लंघन न करता आणि योग्य ती खबरदारी घेऊन या रथ यात्रेचं आयोजन करता येणार आहे.
![Rath Yatra | जगन्नाथ रथयात्रेला अटी-शर्थीसह परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय rath yatra can be conducted without compromising on citizens health supreme court Rath Yatra | जगन्नाथ रथयात्रेला अटी-शर्थीसह परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/22232050/Puri.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : ओडिशातील पुरीमधील जगन्नाथ रथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र या रथ यत्रेसाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. राज्य सरकार आणि मंदिर न्यायाच्या सहकार्याने आरोग्यसंबंधीचा कोणत्याही नियामांचं उल्लंघन न करता आणि योग्य ती खबरदारी घेऊन या रथ यात्रेचं आयोजन करता येणार आहे. प्लेगच्या महामारीदरम्यानही अटी-शर्थींसह या रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
देशभरात परसत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याआधी सर्वोच्च न्यायालयाने रथयात्रेवर स्थगिती आणली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखला झाल्या होत्या. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. काही अटी-शर्थींसह ही रथयात्रा सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
Supreme Court says, Puri rath yatra will be held with coordination of Temple committee, State and central Govt without compromising with health issue. pic.twitter.com/EECA3dR3fT
— ANI (@ANI) June 22, 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांचं पालन करुन हा कार्यक्रम पार पाडला जाऊ शकतो, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. लोकांची गर्दी न करता, कोरोनाची चाचणी करुन पुजाऱ्यांना परवानगी देत ही रथयात्रा पार पाडली जाऊ शकते, अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)