एक्स्प्लोर

Congress : काँग्रेसच्या आणि देशाच्या भल्यासाठी गांधी परिवाराने राजकारणातून संन्यास घ्यावा: रामचंद्र गुहा

Congress : राहुल गांधी हे मोदींसमोर पर्याय ठरू शकत नाहीत, संपूर्ण गांधी परिवाराने राजकारणातून संन्यास घ्यावा असं रामचंद्र गुहा म्हणाले.

नवी दिल्ली: काँग्रेसच्या तसेच देशाच्या भल्यासाठी गांधी परिवारातील तीनही सदस्यांनी केवळ राजकारण न सोडता थेट संन्यास घ्यावा असं मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. यासंबंधी त्यांनी 'द टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकात एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. 

रामचंद्र गुहा यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे की, "देशात जो काही हिंदुत्ववाद्यांचा उच्छाद सुरू आहे त्यासाठी खरं तर गांधी परिवारच कारणीभूत आहे. गांधी परिवाराचे काँग्रेसमध्ये असणं हे मोदींना आणि भाजपला सोईचं आहे. त्यांच्यावर टीका करुन मोदी हे सरकारच्या अपयशापासून लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी होत आहेत."

गांधी परिवाराची पाचवी पीढी राजकारणात असून ते आता सर्वसामान्यांच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव होतोय असंही मत रामचंद्र गुहांनी व्यक्त केलं आहे. जवळपास 200 जागांवर काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, त्यामध्ये केवळ 8 टक्के जागा त्या पक्षाला मिळाल्या आहेत, हे पक्षाचं अपयश असल्याचंही ते म्हणाले. 

राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी मोदींसमोर पर्यायी उमेदवार होऊ शकत नाहीत, त्याचा फायदा हा नरेंद्र मोदींना होतोय असंही ते म्हणाले. 

रामचंद्र गुहा देशातील एक महत्त्वाचे राजकीय विश्लेषक समजले जातात. पाच राज्यातील निवडणुकीतील दारुण पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यामध्ये येत असतानाच रामचंद्र गुहा यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जातंय. 

दरम्यान, रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं असून ते चुकीचं आणि तथ्यहीन असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे. 

रणदीप सुरजेवाला यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "एनडीटीव्हीच्या हवाल्याने राजीनाम्याच्या ज्या काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. एका टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या अशा प्रकारच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडणे हे गंभीर आहे."

संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Embed widget