Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट; विश्वास बसत नाहीये? मग तुम्हीच पाहा
Ram Mandir : तुम्हीही अयोध्येत प्रभू श्रीरामाला भेट देण्याचा विचार करत असाल तर फक्त 10 दिवस थांबा. यानंतर तुम्हाला तिथे जाण्यासाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च करण्याची गरज लागणार नाही. कसं ते जाणून घ्या सविस्तर...
Ram Mandir : अयोध्या : तब्बल 500 वर्षांपासून जे स्वप्न प्रत्येक भारतीयानं पाहिलं होतं, ते पूर्ण झालं. अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीराम (Shree Ram) विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत प्रभू रामचंद्राचा अभिषेक सोहळा पार पडला. आजपासून राम मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. अशातच तुम्हीही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही जरा थांबा. फार काळ नाहीतर फक्त दहाच दिवस. दहा दिवसांनी अयोध्येला जाणाऱ्या फ्लाईट्सच्या तिकीट स्वस्त होऊ शकतात. त्यानंतर अयोध्येला जाण्यासाठी विमानाची तिकीटं अगदी माफक दरात तुम्हाला मिळू शकतात. दरम्यान, सध्या अयोध्येला जाणाऱ्या विमानांची तिकीटं एकतर हाऊसफुल्ल आहेत किंवा तिकीटांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अयोध्येला जाणं थोडं कठीण झालं आहे.
10 दिवसांत तिकीटाचे दर उतरणार
तुम्ही जर आजपासून पुढच्या दहा दिवसांनंतरची विमानाची तिकीटं काढली, तर मात्र तुम्हाला आजच्या किमतीपेक्षा 70 टक्के कमी दरानं तिकीटं मिळतील. तसेच, अयोध्येला पोहोचल्यानंतर तुम्हाला विमानतळावर गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रभू रामाचं दर्शन घेण्यासही उशीर होणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या अयोध्येला जाणाऱ्या सर्वच विमानांच्या तिकीटांमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (23 जानेवारी) जर तुम्ही पाहिलं तर, अयोध्येला जाणाऱ्या बहुतांश फ्लाईट्सची किंमत दहा ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान होती.
जर तुम्ही 10 दिवसांनी तिकीट बुक केलं तर तुम्हाला तेच तिकीट 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान मिळेल. आजपासून दहा दिवसांबाबत बोलायचं झालं तर तारीख असेल 3 फेब्रुवारी. दिल्ली ते अयोध्येचं विमानाचं तिकीट 3522 ते 4408 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
... म्हणून वेळे तिकीटं बूक करा
जर तुम्ही 3 फेब्रुवारीला अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि 4 फेब्रुवारीला परतण्याचा विचार करत असाल, तर त्यावेळचही तिकीट तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल. स्पाईस जेट एअरलाईन्सचं तिकीट तुम्हाला केवळ 3022 रुपयांमध्ये मिळेल. तसेच, इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची तिकिटं थोडी महाग असतील. एअरलाईन्समधील तिकीटं कालांतरानं महाग होतात. त्यामुळे वेळेत तिकीट बुक करा.