Ram Mandir : मी काय फक्त उभं राहून टाळ्या वाजवू का? शंकराचार्य नाराज, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेत जाणार नाही
Ram Mandir inauguration : पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे म्हटले आहे. धर्म सुससंगत गोष्टी होत नसल्याने आपण जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे या सोहळ्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रणं पाठवण्यात येत आहेत. याच दरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद (Puri Shankaracharya Nischalananda) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. आपण राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला स्पर्श करणार आणि मी तिथं उभं राहून टाळ्या वाजवणार? हे शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले.
दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शंकराचार्य निश्चलानंद रतलाम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होता येणार नसल्याचे सांगितले. आपल्या पदाच्या प्रतिष्ठेची जाणीव आहे, त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. शंकराचार्य निश्चलानंद म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी रामललाच्या मूर्तीला हात लावणे शिष्टाचाराच्या विरोधात आहे. अशा स्थितीत तो मर्यादा पुरुषोत्तम यांच्या प्रतिष्ठेचा भंग झाल्याचे साक्षीदार होऊ शकत नाही. ते म्हणाले, राम मंदिरातील मूर्तीचा अभिषेक हा धर्मग्रंथानुसारच झाला पाहिजे.
शंकराचार्य निश्चलानंद यांनी सांगितले की, त्यांना निमंत्रण मिळाले आहे. त्यावर लिहिले आहे की ते फक्त एकाच व्यक्तीसोबत कार्यक्रमाला येऊ शकतात. याशिवाय त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, यामुळेच मी कार्यक्रमाला जाणार नाही. राम मंदिरावर ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे, तसे होऊ नये, असेही ते म्हणाले. सध्या राजकारणात काहीही योग्य नाही. धार्मिक स्थळांवर उभारल्या जाणाऱ्या कॉरिडॉरवरही निश्चलानंद यांनी टीका केली. ते म्हणाले, आज धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळ बनवले जात आहे. अशा प्रकारे त्यांच्यात उपभोग आणि चैनीच्या गोष्टी जोडल्या जात आहेत, जे योग्य नाही. यादरम्यान त्यांनी इस्लामबाबतही मोठे वक्तव्य केले. प्रेषित मोहम्मद असोत की येशू ख्रिस्त असो या सर्वांचे पूर्वज सनातनी होते, असे वक्तव्यही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदींना श्री राम जन्मभूती तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात प्रमुख यजमान म्हणून आमंत्रित केले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान रामललाची मूर्ती स्वतःच्या हाताने गर्भगृहात गादीवर बसवण्याची शक्यता आहे. शंकराचार्य निश्चलानंद यांनी ट्रस्टच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.