एक्स्प्लोर
Advertisement
अयोध्या प्रकरण : सुनावणी लवकर घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादग्रस्त जमीनीच्या प्रकरणावरील सुनावणी लवकर घेण्याची मागणी आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमीनीच्या प्रकरणावरील सुनावणी लवकर घेण्याची मागणी आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई मागणी फेटाळताना म्हणाले की, आम्ही जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुनावणी घेणार आहोत. या प्रकरणावर लवकर सुनावणी घेणे आम्हाला गरजेचे वाटत नाही. अखिल भारतीय हिंदू महासभेने अयोध्येतील वादग्रस्त जमीनीच्या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
वादग्रस्त जमीनीचे तीन भाग करुन रामलला, निर्मोही अखाडा आणि मुस्लिम संघटनांना देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकेवर २९ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात आली, गोगोई यांनी या याचिकेवर पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असे जाहीर करण्यात आले.
त्यानंतर हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपच्या काही नेत्यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. मंदिराचा प्रश्न सोडण्यासाठी खूप उशीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेने त्याविरोधात प्रदर्शन करण्याचा इशारा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement