एक्स्प्लोर

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार?

बीजू जनता दल (बीजेडी)च्या भूमिकेमुळे वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीवर संकट निर्माण झालं आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी माघार घेण्याची चिन्हं आहेत. विरोधीपक्षांमध्ये एकजूट नसल्यामुळे यूपीएकडून संभाव्य उमेदवार वंदना चव्हाण उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. बीजू जनता दल (बीजेडी)च्या भूमिकेमुळे वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीवर संकट निर्माण झालं आहे. गुरुवारी म्हणजेच 9 ऑगस्टला उपसभापतीपदाची निवडणूक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू)चे नेते नितीशकुमार यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक यांना फोन केला होता. त्यामुळे बीजेडी खासदार एनडीएकडून उपसभापतीपदाचे उमेदवार असलेल्या जेडीयू खासदार हरिवंश नारायण सिंह यांना मतदान करण्याची शक्यता आहे. बीजेडीने साथ न दिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या नवीन पटनाईक यांच्याशी फोनवरुन चर्चा करतील. चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर राष्ट्रवादी आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीत शिवसेनेने एनडीएला पाठिंबा द्यावा, अशी विनंती भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोनवरुन केल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनडीएकडून जेडीयू खासदार हरिवंश नारायण सिंह यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकाली दलाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अकाली दलाचे तीन खासदार मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप पुन्हा शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप सभागृहात सर्वात मोठा पक्ष असा असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्रपक्ष आणि काही अपक्ष अशी जोडतोड करुन भाजपचा आकडा 115 पर्यंत पोहोचतो. 13 खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्चित नाही. उपसभापतीपदाची निवडणूक ही विरोधकांच्या एकीची परीक्षा घेणारी आहे. भाजपला नमवण्याची संधी असल्याने सगळे विरोधक राज्यसभेत एकत्र येणार का याची उत्सुकता आहे. विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. यूपीएकडे 113 मतं आहेत, अशा परिस्थितीत नऊ मतं असलेला बीजू जनता दल किंगमेकर ठरु शकतो. राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा? (एकूण 245 जागा, रिक्त 1) एनडीए भाजप 73 जेडीयू 6 शिवसेना 3 अकाली दल 3 एआयएडीएमके 13 आरपीआय 1 सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1 तेलंगणा राष्ट्र समिती 6 नागा पिपल्स फ्रंट 1 अपक्ष 4 नामनिर्देशित 3 एकूण 115 यूपीए काँग्रेस 50 समाजवादी पक्ष 13 राष्ट्रवादी काँग्रेस 4 डीएमके 4 आरजेडी 5 इंडियन युनियन मुस्लीम लीग 1 केरळ काँग्रेस (एम) झारखंड मुक्ती मोर्चा 0 सीपीआयएम 5 बसपा 4 सीपीआय 2 तेलुगू देसम पार्टी 6 जेडीएस 1 तृणमूल काँग्रेस 13 आम आदमी पक्ष 3 नामनिर्देशित 1 एकूण 113 इतर बिजू जनता दल 9 वायएसआर काँग्रेस 2 इंडियन नॅशनल लोक दल 1 पीडीपी 2 अपक्ष 2 एकूण 16
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget