एक्स्प्लोर

राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली?

एनडीएकडून जेडीयूचे हरिवंश तर यूपीएकडून काँग्रेसचे बी के हरिप्रसाद आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या सकाळी 11 वाजता उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीची हवा निघाली आहे. आधी टीएमसी, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार द्यायला नकार दिल्यानंतर, अखेर काँग्रेसला स्वत:चाच उमेदवार यूपीएकडून देण्याची वेळ आली. राज्यसभेत विरोधकांची स्थिती मजबूत असताना, विजयासाठी अगदी थोडेसेच प्रयत्न करायचे बाकी असतानाही बीजेडीने साथ न दिल्याने यूपीए काहीशी बॅकफूटवर गेली आहे. एनडीएकडून जेडीयूचे हरिवंश तर यूपीएकडून काँग्रेसचे बी के हरिप्रसाद आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या सकाळी 11 वाजता उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. उपसभापती निवडणूक : अखेर विरोधकांचाही उमेदवार जाहीर! शरद पवारांनी का घेतली माघार? काल उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. दुपारी एक वाजता मीटिंग झाल्यानंतर त्यात हेच नाव पक्कं झालं होतं. मात्र शरद पवारांनी बीजेडीचे नवीन पटनायक यांना फोन केला, तेव्हा नवीनबाबूंनी नितीशकुमारांनी आधीच समर्थन मागितल्याने, आपण त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं. नवीन पटनायकांची ही भूमिका काँग्रेसला कळवून पवारांनी ते साथ देत नसतील तर आपला उमेदवार देण्यात रस नाही अशी भूमिका घेतली. राज्यसभा : यूपीएमध्ये एकजूटता नाही, राष्ट्रवादीचा लढण्यास नकार? काय आहे गणित? राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. दोन्ही बाजूंचे पक्के मित्रपक्ष पकडले तर यूपीए 115 आणि एनडीए 115 इतकी काट्याची टक्कर आहे. 9 खासदार असलेल्या बीजेडीचं मतदान ज्याच्या पारड्यात, तो विजेता अशी स्थिती होती. पण ओडिशात भाजप हा बीजेडीचा प्रमुख शत्रु असतानाही, उमेदवार नितीशकुमारांचा आहे असं सांगत बीजेडी एनडीएच्या गोटात शिरली आहे. राज्यसभा उपसभापतीपद निवडणूक : शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन 2019 च्या आघाड्यांचं प्रतिबिंब राज्यसभेच्या या निवडणुकीत पुढच्या लोकसभा निवडणुकीत आघाड्यांची जोडतोड कशी होऊ शकते याचं छोटं प्रतिबिंब पाहायला मिळालं. टीआरएस, एआयडीएमके, बीजेडी हे सगळे पक्ष भाजपप्रणित एनडीएच्या बाजूला उभे राहिले. तर शिवसेनाही निमूटपणे एनडीएलाच मतदान करणार आहे. त्यामुळे राज्यसभेत अगदी हातातोंडाशी आलेला विजय विरोधकांच्या हातातून निसटला आहे. सर्वाधिक 73 (नामनिर्देशित 8 पकडून) खासदार भाजपकडे असले तरी पूर्ण बहुमत नसल्याने भाजपने स्वत:चा उमेदवार दिला नाही. मित्रपक्षांना संधी दिल्याशिवाय भाजपलाही एनडीए मजबूत करता आली नसती. दरम्यान करुणानिधींच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काही पक्षांनी केली आहे. डीएमकेचे चार खासदार उद्या मतदानावेळी गैरहजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक उद्या घेऊ नये अशी मागणी काही पक्षांनी सभापतींकडे केली आहे. कुणाकडे किती बलाबल- राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली? राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली? राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 21 January 2024Suresh Dhas FULL Exclusive : महादेव मुंडे ते चेतना कळसे, नव्या हत्यांचा दाखला, धसांनी नवी वात पेटवलीSaif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
Embed widget