एक्स्प्लोर

रेल्वेकडून मिडल बर्थच्या कटकटीवर उपाय, रात्री 10 शिवाय झोपण्यास मनाई

रेल्वेकडून नुकतीच एक नवी नियमावली जारी करण्यात आली असून, यात रेल्वे प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान झोपण्याची निश्चित वेळ बदलून त्यात एक तासांची कपात करण्यात आली आहे. यातून रेल्वेने मिडल बर्थवरील प्रवाशांच्या कटकटीवर नवा उपाय शोधून काढला आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवास करत असाल, तर तुम्हाला अनेक सहप्रवासी ट्रेनमध्ये लवकर झोपताना दिसतील. यातील काही प्रवाशांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. पण रेल्वेकडून नुकतीच एक नवी नियमावली जारी करण्यात आली असून, यात रेल्वे प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान झोपण्याची निश्चित वेळ बदलून त्यात एक तासांची कपात करण्यात आली आहे. यातून रेल्वेने मिडल बर्थवरील प्रवाशांच्या कटकटीवर नवा उपाय शोधून काढला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान, अनेकदा लोअर बर्थ किंवा अप्पर बर्थवरील प्रवाशांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. त्यामुळे या दोन्ही बर्थवरील प्रवासी गप्पा मारत, किंवा मनोरंजनाच्या इतर वस्तूंचा वापर करुन प्रवास मजेत करत असतात. पण त्यामुळे मिडल बर्थच्या प्रवाशांना सवयीप्रमाणे लवकर झोपायची इच्छा असूनही, झोपायाला मिळत नाही. त्यामुळे ते अनेकदा याबाबत तक्रार करत असतात. किंवा काही ठिकाणी हुज्जत घालण्याचे प्रकारही होतात. रेल्वे प्रवाशांसाठीच्या आधीच्या नियमाप्रमाणे रात्री 9 ते 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित होती. त्यामुळे रात्री 9 पर्यंतच अप्पर आणि लोअर बर्थवरील रेल्वे प्रवासी आपल्या सीटवर बसून प्रवास करु शकत होते. यानंतर दोन्ही बर्थवरील प्रवाशांना आपली बर्थ मोकळी करुन, मिडल बर्थवरील प्रवाशांना बर्थ सिट उपलब्ध करुन द्यावी लागत होती. पण आता नव्या नियमानुसार, यात अजून एक तासाची कपात करण्यात आली आहे. रेल्वेने आता रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे पुन्हा मिडल बर्थवरील रेल्वे प्रवाशांना रात्री 10 शिवाय आपल्या बर्थसाठी दावा करण्यात येणार नाही. रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी याबाबत सांगितलं की, प्रवाशांच्या तक्रारींवरुन आम्ही यावर गांभीर्यानं विचार करत होतो. त्यानुसार, आता प्रवासादरम्यान रात्री झोपण्याची वेळ रात्री 9 वरुन 10 करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या निर्णयामुळे इतर प्रवाशांना सीटवर बसण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होतील. विशेष म्हणेज, हा निर्णय साईड अप्पर सीटवरील प्रवाशांसाठी लागू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र, यातून दिव्यांग आणि अजारी व्यक्ती, तसेच गर्भवती महिलांना सूट देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून जनशताब्दी आणि इतर सिटिंग चेअर कार एक्स्प्रेस सोडल्यास, इतर एसी फर्स्ट क्लास, एसी टू टियर व थ्री टियर कोचसाठी हे नियम लागू असतील.

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Ram Mandir Donation Case : राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
Embed widget