एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील टॉप 10 स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने एका त्रयस्थ संस्थेकडून देशातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छेतेबाबत सर्वेक्षण करुन घेतलं. यावेळी जवळपास 407 रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यात आली. त्यातील टॉप 10 रेल्वे स्थानकांची यादी रेल्वे मंत्रालयाने आज जाहीर केली असून, यात महाराष्ट्रातील पुणे जंक्शननं नवव्या स्थानी धडक मारली आहे.
विशेष म्हणजे, या स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत देशातल्या कोणत्याच मोठ्या रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. देशातल्या टॉप 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम स्थानकाने अव्वल स्थान गाढलं आहे.
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या टॉप 10 रेल्वे स्थाकांमध्ये
1). विशाखापट्टणम्
2). सिकंदराबाद जंक्शन
3). जम्मू तावी
4). विजयवाडा
5). आनंद विहार टर्मिनल
6). लखनऊ जंक्शन
7). अहमदाबाद
8). जयपूर
9). पुणे जंक्शन
10). बंगळुरु सिटी
याशिवाय मधुबनी स्टेशन आणि जोगबनी स्टेशन ही दोन रेल्वे स्थानके देशातील सर्वात अस्वच्छ स्थानकं असल्याचं या सर्वेत म्हणलं आहे. या स्वच्छ स्टेशनच्या यादीत मुंबई, कोलकता स्टेशनची नावं नाहीत. तर नवी दिल्ली स्टेशनला टॉप 10 स्टेशनच्या यादीतही स्थान मिळवता आलं नाही. पण दुसरीकडे दिल्लीतील आनंद विहार स्टेशनने या यादीत पाचवं स्थान गाठलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षीत या यादीत महाराष्ट्रातील सोलापूर आणि मुंबई सेंट्रल या दोन स्थानकांचा समावेश होता. पण यंदा या दोनपैकी एकालाही या यादीत आपलं स्थान कायम ठेवता आलं नाही. तर पुण्याचा गेल्यावेळी 75 वा क्रमांक होता. पण यंदा पुण्याने थेट टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे.MR @sureshpprabhu Released Third Party Audit Report on Station Cleanliness and Inaugurated Swachh Rail Portal https://t.co/ElebJPa8Db
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 17, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement