एक्स्प्लोर

Railway Accident : वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले, रेल्वे प्रशासनाची माहिती, हेल्पलाइन क्रमांक जारी

Railway Accident : राजस्थानमधील पाली येथे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले. उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

Railway Accident : राजस्थानमधील (Rajasthan) पाली येथे बांद्रा-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस (Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express) चे 11 डब्बे सोमवारी पहाटे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे 3.27 वाजता झाला. राजस्थानमधील जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शनवर (Rajkiawas-Bomadra section)  रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याचे उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. या दुर्घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. सीपीआरओने सांगितले की, उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचतील. यासोबतच रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

जोधपूर
0291- 2654979(1072) 
0291- 2654993(1072)
0291- 2624125
0291- 2431646

पाली मारवाड
0293- 2250324

रेल्वे वाहतूक विस्कळीत

राजस्थानमधील पाली येथे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर या मार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेनंतर उत्तर पश्चिम रेल्वेने दोन गाड्या रद्द केल्या आहेत. या अपघातामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 14 गाड्यांना या अपघाताचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.

हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले
राजस्थानमध्ये झालेल्या या रेल्वे अपघातामुळे हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही प्रवाशांनी प्रवास रद्द केला, तर जे घराबाहेर गेले होते, त्यांना मार्ग बदलल्याने वाटेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

रद्द केलेल्या गाड्या
1. ट्रेन क्रमांक 14821, जोधपूर-साबरमती ट्रेन सेवा 02.01.23 रोजी रद्द

2. ट्रेन क्रमांक 14822, साबरमती-जोधपूर रेल्वे सेवा 02.01.23 रोजी रद्द

जीवित किंवा वित्तहानी नाही
राजस्थानमधील पाली येथे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, रेल्वेचे 11 डब्बे रुळावरून घसरले असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने न्यूज एएनआयला सांगितले की मारवाड जंक्शनवरून ट्रेन सुटल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच ट्रेनच्या आत मोठा आवाज झाला. त्यानंतर दोन तीन मिनिटांनी गाडी थांबली. यावेळी रेल्वेचे स्लीपर कोचचे डब्बे रुळावरून घसरल्याचे दिसले. घटना घडल्यानंतर 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचली.

इतर बातम्या

Shahapur Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, दोघांचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
Weather Update: देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
Rahul Gandhi and PM Modi: भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची बोचरी टीका
भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची टीका

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Weather Update: देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
PM Modi Melody: तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे शेअर मार्केटमध्ये पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागला, नेमकं काय घडलं, वेगळंच सत्य समोर?
तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट मात्र वेगळंच सत्य समोर
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Donald Trump: अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
बिग ब्रेकिंग! अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
Embed widget