एक्स्प्लोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचार करणार नाहीत, परदेशी रवाना : सूत्र

राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. वायनाड या मतदारसंघापुरतंच ते स्वत:ला सीमित ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकससभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मात्र दुसरीकडे राहुल गांधी नाराज असल्याचे देखील समजते. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे. राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळते आहे.  निवडणूक प्रचारासाठी  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याची माहिती होती. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करणार होते, मात्र ते तिथंही आले नव्हते. दरम्यान, राहुल गांधी बँकॉकला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बँकॉक हा शब्द ट्रेंड करत आहेत. यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. यातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पक्षाने या दोन्ही राज्यातील प्रचाराच्या यादीत राहुल गांधी यांचा समावेश स्टार प्रचारक म्हणून केला आहे.  महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर निकाल 24 तारखेला जाहीर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget