Rahul Gandhi Tweet : राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटने बदलले युवा गोलंदाजाचे नशीब! क्रिकेट अकादमीत मिळणार प्रशिक्षण
Rahul Gandhi Tweet : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुण गोलंदाजाचा हा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक केले. या ट्विटनंतर या मुलाचे नशीबच पालटले आहे.
Rajasthan Teen Bowler : सोशल मीडियावर (Social Media) दररोज काहीतरी व्हायरल होत असते. या माध्यमातून अनेकांना याची मदत मिळते. अलीकडेच घडलेला प्रकार म्हणजे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थानच्या (Rajasthan) एका 16 वर्षीय तरुण गोलंदाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामुळे या युवा गोलंदाजाचे नशीब पालटले आहे. व्हिडीओमध्ये हा मुलगा कोणत्याही प्रकारची सुविधा नसतानाही चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे.
हमारे देश के कोने-कोने में अद्भुत प्रतिभा छिपी हुई है, जिसे पहचानना और बढ़ावा देना हमारा कर्तव्य है।@ashokgehlot51 जी से मेरा निवेदन है, इस बच्चे का सपना साकार करने के लिए कृपया उसकी सहायता करें। https://t.co/vlEKd8UkmS
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2022
.....आणि युवा गोलंदाजाचे नशीब पालटले!
यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुण गोलंदाजाचा हा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले. आता या युवा गोलंदाजाचे नशीब पालटले असून शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी युवा गोलंदाज भरत सिंगची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कौतुक केले
राहुल गांधी यांनी गोलंदाजाच्या प्रतिभेचे कौतुक केल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भरत सिंगला सवाई मानसिंग (SMS) स्टेडियममधील क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगितले आहे. सीएम अशोक गेहलोत यांनी सांगितले की, भरत सिंग क्रिकेट अकादमीमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेईल, तसेच त्याला निवास आणि भोजनासह सर्व सुविधा पुरविल्या जातील.
माशांना पकडण्यासाठी बनवलेल्या जाळ्यांमध्ये सराव
नुकतेच एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील भरत सिंह गावात माशांना पकडण्यासाठी बनवलेल्या जाळ्यांमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. यानंतर राहुल गांधींनी रिट्विट करत या व्हिडीओचे कौतुक केले.