(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधींची भावनिक पोस्ट; वडील राजीव गांधींची काढली आठवण, म्हणाले..
Rahul Gandhi Tweet : भारत जोडो यात्रे'च्या प्रारंभापूर्वी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरवर एक भावनिक नोट शेअर केली. काय म्हटलंय राहुल गांधींनी?
Rahul Gandhi Tweet : काँग्रेसच्या (Conress) 'भारत जोडो यात्रे'च्या प्रारंभापूर्वी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरवर एक भावनिक नोट शेअर केली. ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी श्रीपेरुंबदूर येथील राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली
आज सकाळी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली. श्रीपेरंबुदुर हे तेच ठिकाण आहे जिथे राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलम दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
I lost my father to the politics of hate and division. I will not lose my beloved country to it too.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 7, 2022
Love will conquer hate. Hope will defeat fear. Together, we will overcome. pic.twitter.com/ODTmwirBHR
....आणि मी माझे वडील गमावले - राहुल गांधी
राहुल गांधींनी स्वत:चे छायाचित्र ट्विट करत म्हटले आहे की, "द्वेष आणि फाळणीच्या राजकारणात मी माझे वडील गमावले. मी माझा प्रिय देशही गमावणार नाही. प्रेमाचा द्वेषावर विजय होईल. आपण सर्व मिळून जिंकू.
'भारत जोडो यात्रा' आज संध्याकाळपासून
वडिलांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी महात्मा गांधी मंडप येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कन्याकुमारीकडे रवाना झाले. येथे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या यात्रेच्या शुभारंभाकरिता राष्ट्रध्वज सुपूर्द करतील.
देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय मोर्चा
काँग्रेसने म्हटलंय की, देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय मोर्चा आहे. या यात्रेला आज सायंकाळी 5 वाजता एका समारंभात सुरुवात होणार असून, कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3500 किलोमीटरची पायी यात्रा उद्या सकाळी सुरू होणार आहे. हा प्रवास सुमारे 150 दिवस चालणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Politics : महाराष्ट्र सत्तासंघर्ष: निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
Mahanagar Palika Election 2022 : दिवाळीनंतर निवडणुकांचा बार? मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली