संसदेतच उत्तर देणार, राहुल गांधींचं भाजपला प्रत्युत्तर; लंडनमधील वक्तव्यावर सोडलं मौन
Rahul Gandhi Remarks Row : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये (London) केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ माजला आहे.
Rahul Gandhi Remarks Row : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये (London) केलेल्या वक्तव्यावरुन भारतात भाजपने गोंधळ घातला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले, त्याशिवाय माफी मागावी अशी मागणीही केली. यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरु आहे. राहुल गांधी यांनी याबाबत पत्रकार घेत भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. त्याशिवाय अदानी (Adani) आणि बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरुन (BBC) भाजपवर टीकास्त्र सोडलेय. अदानीच्या मुद्द्यावर भाजप घाबरले आहे, असा घणाघात राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, 'आज संसदेत गेलो आणि लोकसभा अध्यक्षांना बोलण्याची परवानगी मागितली. सरकारमधील चार मंत्र्यांनी माझ्यावर आरोप केले होते, त्यामुळे मी संसदेतच माझं मत मांडणार आहे. भाजपच्या आरोपाला संसदेतच उत्तर देणार आहे. शुक्रवारी मला बोलू देतील अशी आशा आहे. मी खासदार आहे अन् संसदेतच उत्तर देणार आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.
मी सभागृहात पोहचल्यानंतर एका मिनिटात लगेच कामकाज तहकूब करण्यात आले. अदानीच्या मुद्द्यावरुन लक्ष दुसरीकडे हटवण्याचं काम मोदी सरकार करत आहे. काही दिवसांपूर्वी मी सभागृहात मोदी आणि अदानी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत भाषण केले होते. पण त्या भाषणातील भाग काढण्यात आला. सार्वजनिक रेकॉर्डमधून काढण्यात यावे, असे भाषणात मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. अदानी मुद्यावर सरकार आणि मोदी घाबरले आहेत, त्यासाठी त्यांनी हा तमाशा केला. मला संसदेत बोलू देतील असे वाटत नाही. मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध आहेत? हा प्रमुख प्रश्न आहे.
लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर भाजपने राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला होता. हा लोकशाहीवर हल्ला आहे, राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. याबाबत राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भारताच्या विरोधात मी काहीही बोललो नाही. दरम्यान, याप्रकरणावर बोलण्यासाठी राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे वेळ मागितला आहे.
LIVE: Special press briefing by Shri @RahulGandhi at AICC HQ. https://t.co/dDwon0xyJj
— Congress (@INCIndia) March 16, 2023
Maharashtra Politics : 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, आता प्रतीक्षा 'सर्वोच्च' निकालाची