एक्स्प्लोर

Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi On Delhi Protest : अमित शाहांनी दिल्लीत लाठीचार्जचा आदेश दिला नसता तर ते संसदेत आले असते आणि स्पष्टीकरण दिलं असतं. पण ते तसं करत नाहीत, असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. 

नवी दिल्ली: नीट पेपरफुटीवर आंदोलन (NEET Paper Leak Protest)  करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आता त्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. लोकसभेत या मुद्द्यावरून आपल्याला बोलू दिलं नसल्याचा आरोप करत राहुल गांधींनी यावर माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील लाठीचार्ज हा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या आदेशानेच केला. अमित शाहांमुळेच आंदोलक विद्यार्थी हे रक्तबंबाळ झाले, चिरडले गेले, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. अमित शाहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली. 

अमित शाह हे देशाचे हिरो आहेत अशी इमेज निर्माण केली जात आहे. त्यासाठी मोठा पैसा लावण्यात आला आहे, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. परंतु विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे त्यांच्या इमेजचा फुगा फुटला आहे, असा टोला राहुल गांधी यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या लाठ्यांना खिळेही होते. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांना विद्युत करंटही देण्यात आला. एका विद्यार्थाला पेलेट गनच्या माऱ्यामुळे अंधत्व आलं आहे. महिलांना, मुलींनाही मारण्यात आलं. यामध्ये पोलीसांच्या वर्दीत नसलेले काहीजणही लाठीचार्ज करत होते. 

या प्रकरणावर मी संसदेत बोलत होतो पण मला बोलू दिलं गेलं नाही. यावर मंत्री बोलले, पण मला संधी दिली नाही. मला माफी मागायला लावली, पण मी माफी मागितली नाही. विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करणं हा माझा अधिकार आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

'अमित शाहांच्या आदेशानेच लाठीचार्ज'

राहुल गांधी म्हणाले की, "दिल्लीतील पोलीस हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. अमित शाहांच्या आदेशानेच पोलीस चालतात. अमित शाहांनीच विद्यार्थांना चिरडलं, मारलं, रक्तबंबाळ केलं. गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय गोळीबार किंवा पेलेटगनचा वापर केला जात नाही. अमित शाहांना याची कशाचीच माहिती नसेल तर ते अकार्यक्षम मंत्री आहेत. 25 जुलै रोजी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला असं विचारलं. त्याची माहिती मला अद्याप देण्यात आली नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप हुशार आहात, तर तसं नाही. लाठीचार्जचा आदेश कुणी दिला याची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे."

अमित शाह हे लोकसभेत येत नाहीत, लाठीचार्ज कुणी केला याची माहिती देत नाहीत. ते जर अपराधी नसते तर लगेच लोकसभेत आले असते आणि स्पष्टीकरण दिलं असतं. पण ते तसं करत नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget