एक्स्प्लोर

Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी

Rahul Gandhi Slams Modi Government: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2015 आणि 2026 दरम्यान 148 परीक्षा घोटाळे झाले, 87 परीक्षा रद्द तर 9 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाल्याचं म्हटलं. 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट यूजी परीक्षा पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला बोल केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत 22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून त्यांची मेहनत वाया गेल्याचं म्हटलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्यावर एक शब्द देखील बोलले नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीनं पदावरुन हटवलं जावं अन्यथा पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

22 लाख मुलांची फसवणूक झाली : राहुल गांधी 

राहुल गांधी म्हणाले की  नीटसाठी 22 लाख विद्यार्थ्यांनी दोन वर्ष दिवसरात्र मेहनत केली, ती मेहनत वाया गेली. पूर्ण देशाला माहिती आहे, व्हाटसअपवर परीक्षेच्या दोन दिवस अगोदर पेपर वाटण्यात आला. धर्मेंद्र प्रधान जी भारताचे शिक्षण मंत्री म्हणतात मला काही देणं घेणं नाही. कमिटीनं च्या सूचना दिल्या होत्या त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकल्या, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.   

राहुल गांधी म्हणाले की, नीटच्या 22 लाख मुलांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर एक शब्द बोलत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना हटवलं जावं, अन्यथा पंतप्रधानांनी स्वत: स्वीकराली पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.  

राहुल गांधी यांचा हल्लाबोल सुरुच

राहुल गांधी यांनी नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर दोन विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याचा मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी म्हणाले की भाजप सरकारमध्ये परीक्षा घोटाळा करणाऱ्यांना संरक्षण दिलं जातं. तर, मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागतोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.  
 
राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या 21 वर्षीय ऋतिक मिश्रा आणि गोव्यातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा मुद्दा मांडला. परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचले आहेत. हे विद्यार्थी परीक्षेमुळं पराभूत झाले नाहीत तरयांना एका भ्रष्ट पद्धतीनं मारलं आहे, या आत्महत्या नसून व्यवस्थेनं केलेली हत्या असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.  

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांन म्हटलं की 2015 ते 2026 या दरम्यान देशात 148 परीक्षा घोटाळे झाले आहेत. या दरम्यान 87 परीक्षा रद्द झाल्या आहेत तर 9 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणांमध्ये केवळ एका प्रकरणात शिक्षा झाली आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार 17  प्रकरणांमध्ये सीबीआय आणि ईडीनं 11 प्रकरणांमध्ये चौकशी केली मात्र, कोणालाच शिक्षा झाली नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

परीक्षा  घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात कोणताही कठोर कारवाई होत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. एखाद्याला पदावरुन हटवलं गेल्यास लगचेच त्याला मोठ्या पदावर बसवलं जातं. राहुल गांधी म्हणाले की चोरी करणाऱ्यांना बक्षीस मिळतं आणि परीक्षा देणारे विद्यार्थी जीव गमावतात, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, पेपरफुटीमुळं रद्द झालेली नीट यूजी परीक्षा रद्द करावी लागली होती. आता पुन्हा नीट यूजी परीक्षा 21 जूनला आयोजित केली जाणार आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget