एक्स्प्लोर
राहुल गांधी, मनिष सिसोदिया दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली : कमी पेंशनमुळे माजी सैनिक राम किशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर राजधानी दिल्लीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राम मनोहर लोहिरा हॉस्पिटलमध्ये राम किशन ग्रेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पोहोचलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राहुल गांधी यांना मंदिर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
"कसा भारत बनवला जात आहे, जिथे पीडित कुटुंबाला भेटू दिलं जात नाही. या देशात लोकशाहीविरोधी पद्धती अवलंबल्या जात आहे. मला हॉस्पिटलमध्ये जाऊ दिलं नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
सिसोदियाही पोलिसांच्या ताब्यात
त्याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया माजी सैनिकाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये गेले होते. पण तिथे त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.
'वन रँक वन पेंशन'साठी आत्महत्या
'वन रँक वन पेंशन'च्या मागणीसाठी माजी सैनिक राम किशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली. ग्रेवाल यांचं सोमवारपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सहकाऱ्यांसह सातव्या वेतन आयोगानुसार 'वन रँक वन पेंशन' देण्यात यावं, यासाठी धरणं आंदोलन सुरु होतं. मात्र आंदोलनाकडे कोणीही लक्ष न दिल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
संरक्षणमंत्र्यांना देण्यासाठी लिहिलेल्या पत्रावरच ग्रेवाल यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. "देशासाठी, मातृभूमीसाठी, देशाच्या वीर जवानांसाठी माझे प्राण अर्पण करतो," असं ग्रेवाल यांनी लिहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement