एक्स्प्लोर
Advertisement
आता राहुल गांधी माझेही बॉस : सोनिया गांधी
‘राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि आता ते माझेही बॉस आहेत.’
नवी दिल्ली : ‘राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि आता ते माझेही बॉस आहेत.’ असे उद्गार काँग्रेसच्या संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढले. दिल्लीमध्ये आज (गुरुवार) काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक झाली. त्यात सोनिया गांधी बोलत होत्या.
‘गुजरात आणि राजस्थानमध्ये कठीण परिस्थितीमध्ये आपण चांगलं यश संपादन केलं. कर्नाटकातही काँग्रेसला यश मिळेल.’ अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या वर्षाअखेरपर्यंत कर्नाटकात निवडणुका आहेत, सध्या इथं काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे येथील सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आता राहुल गांधींसमोर असणार आहे.
दरम्यान, या बैठकीत बोलताना सोनिया गांधींनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. 'सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली. पण यादरम्यान सर्व महत्त्वाचं संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. संसद, न्यायालय, मीडिया इतकंच नाही तर नागरी समाजाला सरकारने सोडलेलं नाही. तर सुरक्षा यंत्रणांना फक्त विरोधकांना हैराण करण्यासाठीच ठेवलं आहे.' असंही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.
गुजरात निवडणुकीच्या आधी काँग्रेसने राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्यात आलं. काँग्रेसची ही चाल काही प्रमाणात यशस्वी देखील झाली. यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारत भाजपला जोरदार टक्कर दिली. त्यामुळे एक नेतृत्व म्हणून काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहू लागले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement