Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतून पळाल्याची टीका, पण रायबरेलीच का निवडले? 10 मुद्यांमध्ये ट्विस्ट समजून घ्या
अमेठीतून राहुल गांधी यांनी माघार घेतल्याने टीकाही सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनी नारा दिलेल्या डरो मत वरून आता पीएम मोदी यांनीच राहुल गांधी डरो मत, अमेठीतून पळाले, अशी टीका केली आहे.
Rahul Gandhi Rae Bareli : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि देशाच्या मीडियाने अवघा माहोल करून टाकलेल्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीतून लढणार की नाहीत, प्रियांका गांधी रायबरेलीतून लढणार का? याचीच चर्चा रंगली होती. मात्र, आता राहुल गांधी यांनी अमेठी सोडून रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. रायबरेलीवर नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघावर नेहरुंपासून पगडा आहे. त्यामुळे आता अमेठीतून राहुल गांधी यांनी माघार घेतल्याने टीकाही सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनी नारा दिलेल्या डरो मत वरून आता पीएम मोदी यांनीच राहुल गांधी डरो मत, अमेठीतून पळाले, अशी टीका केली आहे. अमेठीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनीही टीका केली आहे.
मात्र, राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत पुन्हा फोकस कायम ठेवला आहे. राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाचे राजकीय अर्थ काय? त्यांना अमेठीतून पराभवाची भिती होती का? अमेठीत जोरदार तयारी सुरु असताना मोर्चा रायबरेलीत का गेला? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 2019 मध्ये अमेठीतून दोन वेळा खासदार राहिलेल्या राहुल गांधी यांचा अमेठीत 55 हजारहून अधिक मतांनी पराभव झाला होता. 2004 पासून रायबरेलीच्या खासदार असलेल्या सोनिया यांनी ती जागा कायम राखली आहे. 2019 मध्ये यूपीमधून काँग्रेसने जिंकलेली एकमेव ती जागा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी रायबरेली निवडमागे काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया.
राहुल गांधी यांनी रायबरेली निवडमागे काय कारणे असू शकतात?
- काँग्रेसला प्रियंका आणि राहुल या दोघांनीही निवडणूक लढवायची नाही याचे एक कारण म्हणजे, सोनिया आधीच राज्यसभा सदस्य आहेत, राहुल आणि प्रियंका दोघेही विजयी झाल्यास संसदेत तीन सदस्य असल्याने भाजपला घराणेशाही आरोपाची संधी मिळेल.
- स्मृती इराणी राजकीय उंची असलेल्या विरोधी नेत्याशी लढण्यास पात्र नसल्याचा संकेत दिले आहेत. तुलनेत काँग्रेसचे निष्ठावंत केएल शर्मा लढत देऊ शकतात. स्मृती इराणींना ही लढत सोपी असली, तरी निश्चितच हलक्यात घेता येणार नाही.
- रायबरेलीतून निवडणूक लढवणे म्हणजे खऱ्या अर्थाने सोनिया गांधींचा शब्द मानणे. उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले अस्तित्व जाणवून देणे.
- मित्रपक्ष समाजवादी पक्षालाही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगला संदेश गेला आहे.
- राहुल गांधी आता संपूर्ण भारत मोहिमेवर लक्ष केंद्रित करू शकतात. कारण त्यांच्याकडे इंडिया आघाडीचा विजय सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी आहे. राहुल गांधी यांनी वारंवार वायनाड सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
- राहुल गांधींच्या विजयानंतर, प्रियंका गांधी रायबरेलीमधून पोटनिवडणूक लढवू शकतात. त्यांच्या आईचा म्हणजेच सोनिया गांधींचा वारसा पुढे नेऊ शकतात.
- इंदिरा गांधींनी भूतकाळात जे केले होते त्याप्रमाणे ही राजकीयदृष्ट्या धोरणात्मक चाल असू शकते. त्यानंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात लक्ष केंद्रित करू शकतात.
- ऐनवेळी राहुल गांधी यांनी रायबरेली निवडून भाजपला सुद्धा अमेठीमधील तयारीवर पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.
- रायबरेलीतून निवडणूक लढवणे आणि अमेठीतून स्मृती इराणींविरोधात केएल शर्मा यांना पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्यास पाठबळ देण्याचा हेतू असू शकतो.
- 1977 मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी रायबरेलीमधून राज नारायण यांच्याकडून पराभूत झाल्या. 1996 मध्ये आणि 1998 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने पुन्हा जागा गमावली. जेव्हा गांधी रिंगणात नव्हते. मात्र, त्यानंतर तेथे पराभव झालेला नाही.
प्रियांका गांधी निवडणूक का लढत नाहीत?
जयराम रमेश यांनी पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, त्या कोणतीही पोटनिवडणूक लढवून संसदेत पोहोचू शकते, परंतु यावेळी त्या जोरदार प्रचार करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक खोट्याला उत्तर देत आहेत. रमेश म्हणाले की, राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांवर अनेकांची मते भिन्न आहेत, पण ते राजकारण आणि बुद्धिबळाचे अनुभवी खेळाडू आहेत आणि विचारपूर्वक आपली वाटचाल करतात. मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पक्ष नेतृत्वाने बराच विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
जयराम रमेश म्हणाले की, रायबरेली ही जागा केवळ काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीच नाही तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही होती. ते म्हणाले, 'हा वारसा नाही, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.' ते म्हणाले की, गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याचा प्रश्न आहे, केवळ अमेठी-रायबरेलीच नाही तर संपूर्ण देश उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. रमेश म्हणाले की, राहुल गांधी उत्तर प्रदेशातून तीनदा आणि केरळमधून एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत, पण मोदीजी खाली जाऊन विंध्याचलमधून निवडणूक लढवण्याची हिंमत का दाखवू शकले नाहीत?
इतर महत्वाच्या बातम्या