Quad Meeting 2022: क्वाडची आज बैठक, PM मोदी आणि बायडेनही होणार सहभागी, रशिया-युक्रेन मुद्द्यावर चर्चेची शक्यता
Quad Meeting 2022 : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज क्वाड देशांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
Quad Meeting 2022 : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज क्वाड देशांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक व्हर्च्युअल असणार आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदीही यात सहभागी होणार आहेत. भारताव्यतिरिक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानचे राष्ट्रपतीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत सामील होणार आहेत. या बैठकीत रशिया-युक्रेन मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने केल्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळाली नसल्याचे परराष्ट्र मंत्र्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले. एका निवदेनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. युक्रेन सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे,
या लोकांचा सहभाग असेल
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बाईडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक आभासी पद्धतीने होणार आहे.
यावर चर्चा केली जाईल
या बैठकीत इंडो-पॅसिफिकमधील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, Quod लीडर्स क्वाडच्या समकालीन आणि सकारात्मक अजेंडाचा एक भाग म्हणून घोषित केलेल्या लीडर्स इनिशिएटिव्हच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा देखील आढावा घेतील. परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला नसला तरी रशिया-युक्रेन संकटावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी चर्चा आहे.
क्वाड काय आहे
हिंदी महासागरातील त्सुनामीनंतर, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी आपत्ती निवारण प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अनौपचारिक युती तयार केली. साधारणपणे, क्वाड ही चार देशांची संघटना असते, त्यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha