एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Viral News : उणे 60 डिग्री तापमान अन् चक्क विमानाच्या लॅन्डिंग गिअरमधून 'दिल्ली ते लंडन' प्रवास

Pardeep Saini : पंजाबमधील दोन भाऊ हे लपून-छपून, विमानाच्या लॅन्डिंग गिअरमध्ये बसून दिल्ली ते लंडन असा प्रवास करतात. या थरारक प्रवासाबद्दल...

Viral News : ही घटना आहे 1996 सालची. लंडनच्या हित्रो एअरपोर्टवर भारतातून आलेलं एक विमान उतरतं, प्रवासी उतरु लागतात, विमानतळावर काम करणारे कर्मचारी सामान उतरवू लागतात. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याला विमानाच्या चाकाजवळ माणसाच्या आकाराची एक आकृती बर्फाच्छादीत अवस्थेत पडलेली दिसते.

कर्मचारी धावत त्या ठिकाणी जातात. एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पडलेली दिसून येते. तातडीनं त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेलं जातं. उपचार सुरू होतात. तो शुध्दीवर आल्यानंतर त्याची विचारपूस केली जाते. कोण तू...??  कुठून आला…?? धावपट्टीवर कसं पोहोचला आणि त्याचा उद्देश काय...??

जे उत्तर मिळतं त्यानं पोलीस आणि डॉक्टरांची हवा टाईट होते. तो व्यक्ती बोलू लागतो, मी प्रदीप सैनी, राहणार पंजाब, भारत. याच विमानातून लंडनपर्यंत पोहोचलो पण विमानाच्या आत नाही तर लॅन्डिंग गिअरजवळ (विमानाची चाकं आत जातात त्या जागेजवळ) उभा राहून.

हे ऐकल्यावर पोलीस चक्रावतात, पहिल्यांदा वाटतं हा वेडा बिडा आहे की काय...?? सखोल चौकशीनंतर समजतं खरं बोलतोय. त्यातच एक प्रश्न विचारुन तो आणखी एक बाँब टाकतो, “माझा भाऊ विजय कसा आहे, कुठे आहे...?? कारण तोही माझ्याबरोबर आला होता दुसऱ्या चाकाच्या आतल्या गँपमध्ये बसून”.

आँ...आँ...पोलिसांना वाटतं आता हा आपल्याला वेडं बनवितो आहे. एवढ्यात लंडनच्या साऊथ वेस्टच्या रिचमन्ड एरियातून एका व्यक्तीचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो. आकाशातून एक माणूस घराच्या बाजूला असलेल्या भागात आदळलाय, मृतावस्थेत आहे. बर्फच झालाय त्याचा. 

त्या ठिकाणी पोलिसांची टीम धावते, पाहते. कपड्यामधल्या कागदपत्रांवरुन तो विजय सैनी असल्याचं समजत. जिवंत असलेल्या प्रदीप सैनीचा लहान भाऊ असतो हा. पोलीस प्रदीप सैनीकडे येतात, आता आणखी काय बोलतोय अशा उत्सुकतेपोटी.

विजय गतप्राण झाल्याचं समजल्यावर प्रदीप रडायला लागतो आणि बोलू लागतो, “आम्ही दोघे भारतातल्या पंजाबमधले. पोलीसांना आम्ही खलिस्तानी अतिरेकी असल्याचं वाटलं आणि पोलीस टॉर्चर करु लागले. आम्ही काही काळ सहन केलं आणि निर्णय घेतला की भारतातून जायचं कायमचं लंडनला जिथे नातेवाईक आहेत”.  

परंतु दोघांकडे ना पासपोर्ट होता ना पैसे ना व्हीजा. मग ते एका तस्कराला पैसे देतात. तो त्यांना लगेज स्पेसमध्ये जागा मिळवून देण्याचं सांगतो. पण पैसे घेतो आणि गायब होतो. शेवटी दोघे दिल्लीला येतात, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करतात, माहिती घेतात लंडनला जाणाऱ्या विमानाच्या वेळेची.

काही दिवस रेकी केल्यानंतर एक जागा सापडते विना चेकिंग विमानतळात शिरायची. रात्रीच्या विमानाचं टेक ऑफ हेरलेलं असतं रेकीत. विमान धावपट्टीवर उभं असताना विमानतळात शिरतात धावपट्टीपर्यंत जातात आणि दोन बाजूच्या दोन टायरवर चढून थेट विमानाच्या लँन्डिंग गेअरमधून आत शिरतात. आहे की नाही कमाल.

विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूच्या वरताण डोकं चालवलं सैनी बंधूंनी राव. विमान धावयाला लागतं, तसं दोघांना वाटतं, एक नंबर सुटलो बुवा. विमान हवेत झेपावतं. दोन्ही चाकं आत यायला लागतात काही काळ दोघांची तंतरते पण पुरेशी जागा मिळते उभं राहायला.

परंतु विमान जसं जसं वर जायला लागतं तसं तसं प्रचंड वारा आणि विमानाच्या इंजिनाचा आवाज यामुळे ‘भिक नको पण कुत्रं आवर’ अशी अवस्था होते. कर्कश्य आवाज करणारं विमानाचं इंजिन हर घडी विचारु लागतं ‘’काय कसं काय वाटतंय...??’’ विमान प्रवास फुकाट...फुकाट...!!

आता 1000 किलोमीटर प्रति तास या वेगानं जाणारं विमान 40 हजार फुटांवर जातं. युरोपकडे झेपावणारं ते विमान थंडी म्हणजे काय असते याचा पुरावा देत जात असतं, दोघा बंधूंना. मायनस 60 डिग्री सेल्सियस तापमानाला विमान पोहोचल्यावर मात्र विजय सैनी प्रकृतीसमोर हार मानतो आणि अखेरच्या प्रवासाला निघून जातो.

इकडे दुसऱ्या चाकाजवळ उभा असलेला प्रदीपही मरणासन्न अवस्थेत पोहोचलेला असतो. 10 तासांच्या प्रवासानंतर अखेर लंडनच्या हित्रो एअरपोर्टवर विमान लँन्डिंगसाठी चाकं उघडतं. चाकं उघडल्या–उघडल्या मृतावस्थेतला विजय सैनी 2000 फुटांवरुन खाली कोसळतो ते थेट एका घराच्या बाजूला. प्रदीप मात्र कसातरी जिवंत असतो, विमान लॅन्ड झाल्यावर तोही अंग टाकतो धावपट्टीवर आणि कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडतो.

हॉस्पिटलमधून बरा झाल्यावर प्रदीपवर गुन्हा दाखल होतो. केस सुरु होते आणि तब्बल 18 वर्षांनंतर त्याची निर्दोष मुक्तता होते ती मानवतेच्या आधारावर. आज प्रदीप सैनी लंडनमध्येच आहे टॅक्सी चालवतोय, चक्क ब्रिटनचं नागरिकत्व मिळवून. एका अचाट कारनाम्यापायी भावाला गमावून.  

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवारSanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
Embed widget