Viral Video : फोनवर बोलत असताना मुलीच्या अंगावरून गेली रेल्वे; पण...पाहा हा थरारक व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.
Viral Video : गेल्या काही वर्षांत मोबाईलच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: तरुणांमध्ये मोबाईलबद्दल वेगळंच आकर्षण दिसून येतंय. एक काळ असा होता की, ज्यावेळी दूरच्या नातेवाईकांशी संवाद साधता यावा, त्यांची खुशाली विचारता यावी यासाठी फोनचा वापर केला जायचा. मात्र, आता काळ बदलला आहे. लोकांनी फोनला इतकं अत्यावश्यक बनवून ठेवलं आहे की त्यांना त्यांच्या जीवाचीही पर्वा नाहीये. आता या व्हायरल व्हिडीओतील मुलीकडेच बघा. फोनवर बोलणं मुलीसाठी इतकं महत्त्वाचं होतं की ती रुळावर चक्क झोपली. एवढेच नाही तर ट्रेनही त्याच्या अंगावरून गेली. त्यानंतरही तरुणीने फोनवर बोलणे थांबवले नाही.
पाहा हा व्हिडीओ :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 21 सेकंदाच्या व्हिडीओने लोकांना धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी रुळावर पडलेली दिसतेय. इतक्यात ट्रेन मुलीच्या अंगावरून जाते. ट्रेन गेल्यानंतर मुलगी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे आढळून आले. ट्रेन सुटल्यानंतर मुलगी जागी होते जणू काही घडलेच नाही. ती मुलगी आरामात उठते आणि फोनवर बोलत प्लॅटफॉर्मवर चढू लागते. तेव्हा तिला प्लॅटफॉर्मवर उभे असलेले लोक तिच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त करतात.
ट्विटरवर शेअर केलेला 21 सेकंदांचा व्हिडीओ आतापर्यंत 91 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनबद्दल बोलताना तरुणीच्या निष्काळजीपणामुळे नेटकऱ्यांना चांगलीच चीड आली आहे. व्हिडीओ कुठल्या रेल्वे स्टेशनचा आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या :