एक्स्प्लोर
PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती
दिल्लीमध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ग्राहकांनी घाबरु नये, असं आवाहनही यावेळी सुनील मेहतांनी केलं.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11 हजार 360 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आज पीएनबीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेने दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून बँक या प्रकरणातून पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी व्यक्त केला.
दिल्लीमध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ग्राहकांनी घाबरु नये, असं आवाहनही यावेळी सुनील मेहतांनी केलं.
मुंबईच्या ब्रीच कँडी शाखेतून डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी बँकेची आर्थिक फसवणूक केली. यानंतर त्याच्या देशभरातील 10 ठिकाणांवर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
व्यवस्थेची फसवणूक करण्याचा प्रयत्न, ग्राहक असो वा कर्मचारी, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करणार : PNB
123 वर्षांत पीएनबीने अनेक चढउतार पाहिले, बँक पूर्ण क्षमतेने दोषींवर कारवाई करत आहे, आम्हाला थोडा वेळ द्या, मेहतांचं आर्जव
संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सुरुवातीला आम्ही तपशिलवार माहिती दिली नाही : PNB
हा घोटाळा म्हणजे एक कॅन्सरी, आम्ही सर्जरी करण्याचा प्रयत्न करत आहोत : PNB
या प्रकरणाचा संबंध विजय माल्याच्या प्रकरणाशी जोडू नका, हा स्वतंत्र घोटाळा आहे : PNB
स्वच्छ, पारदर्शी आणि जबाबदार बँकिंग व्यवस्थेसाठी आम्ही कटिबद्ध, सर्व स्टेकहोल्डर्सच्या संपर्कात आहोत : PNB
तपास यंत्रणांना बँकेकडून पूर्णपणे सहकार्य : PNB
2011 पासून हा घोटाळा सुरु होता, तेव्हाच तपास यंत्रणांना माहिती दिली होती : PNB
नीरव मोदी डायमंड्सची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या प्रियंका चोप्राने नीरव मोदीसोबत सर्व व्यवहार तोडले आहेत. करारानुसार रक्कम न दिल्याचा आरोप तिने आणि तिच्या टीमने केला होता, प्रियंकाच्या मॅनेजरची माहिती
हा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला. त्यानंतर नीरव मोदीविरोधात 280 कोटी रुपयांच्या अफरातफरीची वेगळी केस दाखल करण्यात आली. मात्र काल हा सगळा घोटाळा तब्बल 11 हजार 360 कोटीचा असल्याचं समोर आलं.
संबंधित बातम्या :
PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?
PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले
पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement