मोठी बातमी! 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या, पंजाबमध्ये भीषण अपघात
Khanna Vehicle Collisions : अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ धुक्यामुळे सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून अपघात घडला. या अपघातात सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
Punjab Major Accident : पंजाबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लुधियाणामधील खन्ना येथे 100 वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पंजाबमधील खन्ना येथे धुक्यामुळे सुमारे 100 वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.
100 गाड्या एकमेकांवर धडकल्या
पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघाताचं कारण धुके असल्याचं बोललं जात आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघाता सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
VIDEO | Casualties feared after several vehicles collided with each other due to fog in Khanna, Ludhiana. More details are awaited. pic.twitter.com/Wwdvnyurlq
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2023
पंजाबमध्ये भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सुमारे 100 वाहनांचे नुकसान झालं आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रुग्ण गंभीर असून त्यांना इतर रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे.
अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.
दृष्यमानता कमी झाल्याने अपघात
मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 20-25 किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि धुके यामुळे दृष्यमानता कमी होऊन अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे 20-25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.