एक्स्प्लोर

Pulwama terror attack : आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ, गौतम गंभीरचा संताप

यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली, अशा शब्दात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी चीड व्यक्त केली आहे.

मुंबई : पुलवामात 39 सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही या घटनेविषयी चीड व्यक्त केली आहे. आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे, असं गंभीरने म्हटलं आहे. 'हो, चला फुटीरतावाद्यांशी बोलुयात. हो, चला पाकिस्तानशी संवाद साधूयात. मात्र यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली. श्रीनगर-जम्मू हायवेवर 18 (ट्वीट करतानाचा आकडा) सीआरपीएफ जवान आयईडी स्फोटात शहीद' असं ट्वीट गौतम गंभीरने केलं. दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केलं. गंभीरप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या घटनेचा निषेध केला आहे. 'जम्मू काश्मिरमध्ये आपल्या झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले सीआरपीएफचे शूर जवान धारातीर्थी पडले. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. जखमींची प्रकृती सुधारावी यासाठी शुभेच्छा' अशा भावना क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केल्या आहेत. याशिवाय क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन, रिषभ पंत, प्रवीण कुमार, उन्मुक्त चंद, हरभजन सिंह, बॉक्सर विजेंदर सिंह, मनोज कुमार, कुस्तीपटू साक्षी मलिक यांनीही हल्ल्याचा निषेध करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संबंधित बातम्या :
पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद
जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी
हल्ल्यावेळी चूक कुठे झाली, शोधून काढायला हवे, सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड निंभोरकरांचे मत
शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा
Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं
Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!
भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन
Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य
Pulwama terror attack : दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालक भागवतांची मागणी
Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?

व्हिडीओ

Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Embed widget