एक्स्प्लोर

Pulwama Terror attack : 'त्या' चॅनेलने पाकिस्तान क्रिकेट लीगचं प्रक्षेपण थांबवलं

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांनी पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका दिला आहे. 'डीस्पोर्ट' या क्रीडा वाहिनीने पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यांचं भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटला मोठा दणका बसला आहे.

नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. दहशतवाद्यांना पाकिस्तान सातत्याने पाठिशी घालत असल्याने भारतात पाकिस्तानविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकार राजकीय आणि लष्करी पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय नागरिकही भारत सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांनी पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका दिला आहे. 'डीस्पोर्ट' या क्रीडा वाहिनीने पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यांचं भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटला मोठा दणका बसला आहे. भारताच्या आयपीएलला कॉपी करत पाकिस्तानमध्ये 'पाकिस्तान सुपर लीग' ही स्पर्धा खेळवली जाते. पीएसएलच्या प्रसारणाचे हक्क 'डीस्पोर्ट' या वाहिनीकडे आहेत. पीएसएलचे आधीचे दोन सीझन भारतात केवळ संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आले होते. 2018 मध्ये डीस्पोर्टने या पीएसएलच्या प्रसारणाचे हक्क मिळविले होते. परंतु पुलवामा येथील हल्ल्यानंतर डीस्पोर्टने सुपर लीगला भारतात ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानी क्रिकेटला जबर झटका बसला आहे. डीस्पोर्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यामध्ये ते म्हणाले की, पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण आम्ही थांबवले आहे. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्हीदेखील संवेदनशील आहोत. पुलवामा हल्ल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत. जगभर गाजत असलेल्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये(आयपीएल)पाकिस्तानी खेळाडूंवर फार पूर्वीच बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलला कॉपी करत पाकिस्तानने पीएसएल सुरु केलं. परंतु पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजशिवाय दुसऱ्या कोणत्याही देशात पीएसएलची चर्चासुद्धा झाली नाही. पीएसएलला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी या लीगचे भारतात प्रसारण व्हावे यासाठी पाकिस्तानने खूप प्रयत्न केले होते. अखेर मागच्या वर्षी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. परंतु आता पीएसएलचं भारतातलं प्रक्षेपण बंद झाल्याने पाकिस्तानी क्रिकेटला मोठा दणका बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget