(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Puducherry: पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदींची उचलबांगडी, काँग्रेस सरकार अल्पमतात
पुद्दुचेरीच्या (Puducherry) नायब राज्यपाल (LG) पदावरुन किरण बेदी (Kiran Bedi) यांची अचानक उचलबांगडी करण्याचा आदेश राष्ट्रपतींनी दिला आहे. तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे पद्दुचेरीच्या नायब राज्यपालाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
पद्दुचेरी: पुद्दुचेरीमध्ये राजकीय संकट गडद होत असून त्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल किरण बेदी यांना तात्काळ प्रभावाने हटवण्याचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले आहेत. तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे पद्दुचेरीचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. पद्दुचेरी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहेत.
नायब राज्यपालपदी कार्यरत असताना किरण बेदींचे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्याशी मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते. नायब राज्यपालांच्या निर्णयामुळे पुद्दुचेरीच्या संबंधित अनेक निर्णय रखडलेले असून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर फोडायला सुरु केलं होतं. त्यामुळे पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांची सहानुभूती मिळत आहे अशी तक्रार काही भाजप नेत्यांनी केंद्राकडे केल्याची माहिती होती.
सूर्यातून 'ओम' आवाज येतो; राज्यपाल किरण बेदींचा जावई शोध
नायब राज्यपालांना त्यांच्या पदावरुन हटवलं आहे. किरण बेदी यांनी राज्याच्या विकास कामात अडथळा निर्माण केला असल्याचा आरोप करत त्यांनी हा विजय पद्दुचेरीच्या जनतेचा असल्याचं सांगितलं.
पुद्दुचेरीतील मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्या गटातील चार काँग्रेस सदस्यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने आपले बहुमत गमावले आहे. त्यामुळे नारायणस्वामी यांचं सरकार अल्पमतात आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ 14 आमदार राहिले आहेत. मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे.
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन जरी हटवण्यात आलं असलं तरी किरण बेदींना दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
हवाई दलात सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतीय हवाई दल हे सामर्थ्यवान बनेल: राष्ट्रपती