एक्स्प्लोर

सूर्यातून 'ओम' आवाज येतो; राज्यपाल किरण बेदींचा जावई शोध

सूर्यातून 'ओम' आवाज येत असल्याचा व्हिडीओ राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विट केला आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहेत.

मुंबई : नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला असून त्यातून 'ओम' असा आवाज येत असल्याचा व्हिडीओ पदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला जवळपास चार हजार लोकांनी रिट्विट केले असून अकरा हजारच्यावर लोकांनी लाईक्स केलं आहे. यावरुन अनेकांनी बेदी यांना कमेंट करुन त्यांना ट्रोल केलंय. एका युजरने नासाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करुन हे बघा, बाय नासा, असा उपहासात्मक टोला लगावला. ताऱ्यांना जसा प्रकाश असतो, तसा त्यांचा आवाजही असतो. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने यावर संशोधन करुन सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. नासामधील सायन्स डिरेक्टर अलेक्झा यंग यांनी याविषयीचा व्हिडीओ त्यांच्या संकेतस्थळावर पोस्ट केला आहे. यामध्ये याची सविस्तर माहिती दिली आहे. माजी आयपीएस अधिकारी आणि पदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी केलेल्या ट्विट केलेल्या व्हिडीओत आपली आकाशगंगा दिसत असून केंद्रस्थानी सूर्य आहे. नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला असून त्याचा ओम, असा आवाज येत असल्याचं लिहलं आहे. सूर्यामध्ये प्रचंड प्रमाणात उर्जा आहे, या उर्जेमुळे लहरी तयार होतात. या लहरींचा आवाज येतो. मात्र, या लहरी उच्च वारंवारतेच्या (High Frequency)असल्याने मानवीला ऐकू येणे शक्य नाही. या लहरींमधून एक आवाज येतो जो ओम सारखा असल्याचा दावा या व्हिडीमधून करण्यात आला आहे. व्हिडीओमुळे किरण बेदी ट्रोल - या व्हिडीओमुळे किरण बेदी यांना अनेकांनी ट्रोल केलं आहे. आम्ही तुम्हाला बुद्धीवान समजत होतो, मात्र, तुम्ही भ्रमनिरास केला, असं एका युजरने म्हटलं आहे. तर, अनेकांनी ऋतिक रोशनचा चित्रपट कोई मिल गयाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. माँ मेरी शक्तीओका गलत इस्तमाल किया...असंही मीम्स एकानं शेअर केलाय. काही युजर्सने त्यांचं समर्थनही केलं आहे. मात्र, अनेकांनी मजेशीर मीम्स शेअर करत त्यांना ट्रोल केलंय. एका युजरने नासाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करत नासा बाय...असा टोला लगावलाय. खरंच सूर्यातून ओम आवाज येतो का? - नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. मात्र, यातून ओम सदृश्य कोणताही आवाज येत नसल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. सूर्यात हायड्रोज या वायुचे रुपांतर हेलियममध्ये होते. यावेळी प्रचंड प्रमाणात प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. आपला सूर्य हा वायुंचा गोळा आहे. त्यावर सातत्याने सौरवादळे होत असतात. परिणामी उच्च वारंवारतेच्या लहरी त्यातून बाहेर पडतात. मात्र, या लहरिंचा आवाज हा पूर्णतः वेगळा ऐकू येतो. त्यामुळे किरण बेदी यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ खोटा आहे. संबंधित बातमी : चांद्रयान पुन्हा झेपावणार; चांद्रयान-3 ला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल Explainer Video | अॅस्ट्रो पर्यटनाच्या माध्यमातून आकाशातून ग्रहण पाहण्याचा मुंबईतील पहिला प्रयोग | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget