एक्स्प्लोर

हवाई दलात सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतीय हवाई दल हे सामर्थ्यवान बनेल: राष्ट्रपती

भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच देशाच्या सुरक्षा आणि आपत्तकालीन कार्यातील योगदानाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हंटले आहे की हवाई दलात राफेल,अपाचे यांच्या समाविष्टासह सुरू असलेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही भारतीय हवाई दलाला एका शक्तीशाली रणनीती दलात रुपांतरित करेल. भारतीय हवाई दलाच्या 88 व्या वर्धापन दिनानिमित्त ते म्हणाले की हवाई दलाच्या भारतीय आकाश सुरक्षित करण्यासोबतच देशभरात मानवतावादी कार्य आणि आपत्तीच्या काळातील केलेल्या कार्याबद्दल देश त्यांच्या नेहमी ऋणात राहील. येत्या काळात भारतीय हवाई दल त्यांची वचनबध्दता आणि कौशल्य यांची गुणवत्ता कायम ठेवतील असा मला विश्वास आहे असे रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. भारतीय हवाईस दल दिनानिमित्त आम्ही हवाई योध्दे, दिग्गज अधिकारी आणि हवाई दलातील सदस्यांच्या कुटुबीयांचा आम्ही अभिमानपूर्वक सन्मान करतो असेही ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले. भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. गेल्या काही महिन्यांपासून लडाखच्या सीमेवर भारताचा चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेच्या कसरतींकडे सगळ्या जगाचे लक्ष होते. आजच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये राफेल, सुखोई, मिग-29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांसोबत चिनूक, अपाचे  हेलिकॉप्ट यांनी फ्लाय पास्टमध्ये भाग घेऊन जगाला आपली ताकद दाखवली.  स्वदेशी रडार सिस्टमचा देखील यात समावेश होता. भारतीय हवाई दलात नव्याने दाखल झालेले राफेल लढाऊ विमान हे यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. रामनाथ कोविंद यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रंदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई दलानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय वायुदल आपल्या नेक्स्ट जनरेशन स्टेल्ट फिचर असलेल्या अॅडवान्स कॉंबॅट एअरक्राफ्टची संख्या वाढवायचा विचार करता आहे. याबाबत भारतीय हवाई दल हे काही हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि., एअरोनॉटिक्स डेवलपमेंट एजन्सी आणि DRDO यांच्यासह काही परदेशातील कंपन्यांच्या मदतीने काम करणार आहे. भारतीय हवाई दल हे जगातील प्रबळ हवाई दलांपैकी एक समजले जाते. राफेलचा समावेश झाल्याने हवाई दलाची ताकद अधिकच वाढली आहे. भारतीय हवाई दलाची स्थापना 1932 साली ब्रिटीश-भारतात झाली होती. दुसऱ्या जागतिक महायुध्दाच्या काळात हवाई दलाने केलेल्या पराक्रमाने भारावून इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा याने त्यांना रॉयल ही उपमा दिली होती. स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतीय हवाई दलाने ही उपमा वापरायची बंद केली. संबंधीत बातम्या:

IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार!

वायु्दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलाची कवायतीची सुसज्ज अशी रंगीत तालीम

" "
-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget