(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Protest | सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलक आणि स्थानिकांमध्ये झटापट, दोन पोलीस अधिकाऱ्यांसह पाच जण जखमी
आंदोलक आणि स्थानिकांनी एकमेकांवर दगडफेक केली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. यांनातर याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे निदर्शने सुरू आहेत. सिंधू बॉर्डर वर आंदोलन करणार्या शेतकर्यांविरोधत या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केलं. या आंदोलकांनी परत जावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलक आणि स्थानिकांनी एकमेकांवर दगडफेक केली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. यांनातर याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमध्ये पाच जण जखमी झाले आहेत. तर दोन पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत.
दिल्ली पोलिसांचे अलीपूर पोलिस स्टेशन प्रभारी (एसएचओ) प्रदीप पालीवाल हे जखमी झाले आहेत. सध्या सिंघू सीमेवर शांतता आहे पण तणाव कायम आहे. अजूनही लाठ्याकाठ्यांनी सज्ज स्थानिक लोक सिंघू सीमेवर जमलेले आहेत. स्थानिक शेतकरी तंबूपासून दूर आहेत परंतु पोलिस त्यांना हटवतही नाहीत. सिंहू सीमेवर झालेल्या चकमकीनंतर या परिसरातील बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फोटो जारी केला आहे. पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला कसा झाला हे या फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. दिल्ली पोलिसांनी या ट्वीटमध्ये पीएमओ, गृह मंत्रालय, दिल्लीचे उपराज्यपाल आणि पोलिस आयुक्तांना टॅग केलं आहे.
SHO Alipur, Delhi intervenes between rioting protestors (MKSC faction) and local Singhu villagers, who had gone to register their protest against the happenings on Republic Day-2021 and continued loss of ordinary livelihoods for over two months.. @CPDelhi @LtGovDelhi@PMOIndia pic.twitter.com/mHRtduL6q0
— #DilKiPolice Delhi Police (@DelhiPolice) January 29, 2021
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सिंघू सीमा परिसरात आंदोलन करणारे शेतकरी आणि स्थानिक लोक यांच्यात झालेल्या चकमकी दरम्यान अलीपूर एसएचओ घटनास्थळी गेले होते. त्यावेळी एसएचओंना मारहाण झाली आहे. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. परिसरात आता शांतता पूर्ववत झाली आहे. कायदेशीर कारवाई सुरू केली जात आहे.
स्वत:ला स्थानिक लोक सांगणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवरील आंदोलन संपवावं आणि ही जागा खाली करावी. कारण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड दरम्यान आंदोलकांनी राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला आहे. स्थानिक लोकांचा एक गट हातात लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलन स्थळी पोहोचला आणि शेतकऱ्यांनी तेथून निघून जाण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली.
संबंधित बातम्या
Ghazipur Farmer Protest : गाजीपूर आंदोलनात अश्रूंनी पलटवली बाजू, रात्रभरात हाय व्होल्टेज ड्रामा
राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी गाझीपूर सीमेवरील वातावरण बदललं, शेतकरी आंदोलनस्थळी परतण्यास सुरुवात
'आता आपली बाजू निवडण्याची वेळ, मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत' : राहुल गांधी