एक्स्प्लोर

Farmer Protest: 'आता आपली बाजू निवडण्याची वेळ, मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत' : राहुल गांधी

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आता आपली बाजू निवडण्याची वेळ आहे. माझा निर्णय झालाय. मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत आहे आणि त्यांच्या शांतीपू्र्ण आंदोलनासोबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाजीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकारने आंदोलनाची जागा करणाऱ्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसापासून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. यावर आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आता आपली बाजू निवडण्याची वेळ आहे. माझा निर्णय झालाय. मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत आहे आणि त्यांच्या शांतीपू्र्ण आंदोलनासोबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश

दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाजीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकारने आंदोलनाची जागा करणाऱ्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीनर गाजीपूर बॉर्डरवर पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. आदेशानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गाजियाबाद प्रशासनाशी बातचीत करणार नाही नसून या संदर्भात फक्त केंद्र सरकारशीचं चर्चा होईल.

गाजीपूर बॉर्डरवर तणाव, आंदोलक शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे प्रशासनाचे आदेश

गाजियाबाद सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मध्यरात्रीपर्यंत यूपी गेट खाली करण्याचे आदेश दिले आहे. गाजियाबादचे जिल्हाधिकारी अजय शंतर पांडे म्हणाले, दिल्लीतील यूपी गेटवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बातचीत केली असून रात्रीपर्यंत आंदोलनाची जागा खाली करण्यास सांगितले आहे. जर शेतकरी आंदोलकांनी जागा खाली नाही केली तर प्रशासनाला कडक पावले उचलावी लागतील.

राकेश टिकैत म्हणाले, ...तर मी इथेच फाशी घेईल

राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गोळी चालवली तरी आम्ही जागा खाली करणार नाही. गोळी चालवली तरी आम्ही मागे हटणार नाही. आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. कोणालाही अटक नाही होणार जर अटकेचा प्रयत्न केला तर मी इथेच फाशी घेईल.

शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्‍याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 37 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.

Farmers Protest | सिंघू बॉर्डवर पुन्हा गोंधळाचं वातावरण; आंदोलक शेतकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
PM Modi Meeting with Shiv Sena MPs: पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...

Embed widget