एक्स्प्लोर

Farmers Protest | राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी गाझीपूर सीमेवरील वातावरण बदललं, शेतकरी आंदोलनस्थळी परतण्यास सुरुवात

आंदोलन संपतंय असं वाटत असतानाच शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी गाझीपूर सीमेवरील वातावरण बदललं. शेतकरी आंदोलनस्थळी परतण्यास सुरुवात झाली आहे.गाझीपूरमध्ये सरकार बॅकफूटवर का आलं? गाझीपूर सीमेवर रात्री काय घडलं?

गाझीपूर : शेतकरी आंदोलनावरुन सरकार आणि शेतकऱ्यांच्या एका गटात तणाव वाढला असतानाच गाझीपूर सीमेवर रात्री उशिरा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सीमा मोकळी करण्यासाठी मोठ्या संख्याने तैनात झालेले पोलीस रिकाम्या हाती परतले. तर शेतकरी आंदोलनस्थळी पुन्हा परतले आहेत. पोलिसांसोबतच इथे रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही तैनात होते. रात्री एक वाजता पोलीस इथून माघारी परतले आणि आंदोलकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

याआधी इथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर गाझियाबाग प्रशासनाकडून गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांना स्थळ सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु रात्री होता होता दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी पाऊल मागे घेतलं. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी केंद्र आणि यूपी सरकार बॅकफूटवर आल्याचं म्हटलं जात आहे.

तर दुसरीकडे थंड पडलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तीव्र केलं आहे. दिल्लीच्या शेजारील राज्यातून शेतकऱ्यांचे गट आंदोलनस्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भिवाणी, मेरठ, बागपतहून रात्री उशिरा शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला हवा दिली आहे.

Farmer Protest: 'आता आपली बाजू निवडण्याची वेळ, मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत' : राहुल गांधी

26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी संघटना बॅकफूटवर आल्या आणि सरकार फ्रंटफूटवर खेळू लागलं. ठिकठिकाणांहून आंदोलकांना हटवण्यास सुरुवात झाली. कुठे लाठ्याकाठ्यांनी तर कुठे चर्चेने आंदोलकांना माघारी परतण्यास सांगितलं जात होतं.

एवढंच नाही तर गाझीपूर सीमेवर प्रशासनाने वीज आणि पाण्याचं कनेक्शनही तोडलं होतं. प्रशासनाच्या या कारवाईनंतर भारतीय किसान युनियनचे नेते नरेश टिकैत यांनी आंदोलन संपवणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर गाझियाबाद प्रशासनाकडून आंदोलनस्थळ रिकामं करण्याचं आदेश देण्यात आला. एकीकडे जिल्ली पोलीस होते आणि दुसरीकडे यूपी पोलीस. एनएच-24 बंद करण्यात आला.

थोड्या वेळाने शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मंचावर आंदोलकांना संबोधित केलं. यावेळी ते ढसाढसा रडले. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर आरोप करत आंदोलन संपवण्यास नकार दिला. तिन्ही कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन असा इशारा त्यांनी दिला. टिकैत भावूक होत रडू लागले आणि त्यानंतर गाझीपूर सीमेवरील माहौर बदलला.

Farmer Protest : गाझीपूर बॉर्डरवर तणाव वाढला, राकेश टिकैत भावूक होत म्हणाले, '...तर मी इथेच फाशी घेईन'

राकेश टिकैत रडल्यानंतर त्यांच्या गावातील वातावरण तापलं. मुजफ्फरनगरमध्ये त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनी रात्री अचानक पंचायतीची बैठक बोलावली. यामध्ये हजारो शेतकरी आले. बैठकीत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय झाला.

शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार खुजी झालं. गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना हटवण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना मागे बोलवण्यात आलं.

यासोबतच संध्याकाळी इथून हटवलेला लंगरही शेतकरी आंदोलकांनी पुन्हा सुरु केला. कृषी कायदे मागे घेण्याची त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत इथून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

Delhi Gazipur Border | गाझीपूर सीमेवर प्रशासनाची नरमाईची भूमिका, शेतकरी पुन्हा आक्रमक भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget